• Download App
    "रिव्हर्स बॅंक??" : 25 कोटी रुपये मूल्याच्या 2000 च्या बनावट नोटा जप्त|Reverse Bank Fake 2000 notes worth Rs 25 crore seized

    “रिव्हर्स बॅंक??” : 25 कोटी रुपये मूल्याच्या 2000 च्या बनावट नोटा जप्त

    वृत्तसंस्था

    सुरत : गुजरातमधील सुरत शहरामध्ये पोलिसांना बनावट नोटांचा मोठा साठा सापडला आहे. कामरेज पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी खब-यांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे ही करवाई केली. या नोटांचे मुल्य 25 कोटी 80 लाख रुपये इतके आहे.|Reverse Bank Fake 2000 notes worth Rs 25 crore seized

    गुजरात पोलीस दलातील ग्रामीण विभागाचे अधिक्षक हितेश जोसर यांनी या कारवाईसंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. मुंबई- अहमदनगर मार्गावरुन मोठ्या प्रमाणात चलनी नोटा नेल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या मार्गावरुन जाणा-या एका रुग्णवाहिकेला चेकपोस्टवर अडवले आणि तपासणी केली असता त्यांना रुग्णवाहिकेमध्ये चलनी नोटांच्या सहा मोठ्या पेट्या आढळून आल्या.



    रुग्णवाहिकेच्या मागच्या बाजूला ठेवलेल्या सहा कंटेनरमधील 1 हजार 290 पाकिटांमध्ये 2 हजार रुपयांच्या चलनी नोटा पोलिसांना सापडल्या. या नोटांचे मूल्य 25 कोटी 80 लाख इतके असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या नोटांवर रिझर्व्ह बॅंकेऐवजी रिव्हर्स बॅंक असे छापण्यात आले होते.बॅंकेच्या अधिका-यांकडे आणि फाॅरेन्सिक टीमकडे या नोटा पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

    |Reverse Bank Fake 2000 notes worth Rs 25 crore seized

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rohini Acharya : लालू कुटुंबात कलह : रोहिणी म्हणाल्या- किडनी देण्याची वेळ आली तेव्हा मुलगा पळून गेला

    Shivamogga : कर्नाटकातील शिवमोगा येथे धर्म विचारून तरुणावर हल्ला; हिंदू असल्याचे सांगितल्यावर मारहाण, 50,000 लुटले

    Bangladesh : बांगलादेशात हसीना यांचे वक्तव्य छापण्यास बंदी, सरकारने माध्यमांना दिला कडक इशारा