• Download App
    Nupur Bora आसाम मध्ये पैशाच्या हव्यासापोटी हिंदू महिला अधिकाऱ्याचा लँड जिहाद; सहा वर्षांच्या सेवेत संपत्तीचा डोंगर; हेमंत विश्वशर्मा सरकारने चालविला कायद्याचा बडगा!!

    Nupur Bora आसाम मध्ये पैशाच्या हव्यासापोटी हिंदू महिला अधिकाऱ्याचा लँड जिहाद; सहा वर्षांच्या सेवेत संपत्तीचा डोंगर; हेमंत विश्वशर्मा सरकारने चालविला कायद्याचा बडगा!!

    नाशिक : आसाम मध्ये पैशासाठी हिंदू महिला अधिकाऱ्याने लँड जिहाद केल्याची धक्कादायक बाब चौकशी आणि तपासात समोर आली‌. संबंधित हिंदू महिला अधिकाऱ्याच्या घरी आसाम पोलिसांनी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात तिच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आढळली. त्यामुळे आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी आसाम मधल्या महसूल विभागातल्या संशयास्पद अधिकाऱ्यांवर चौकशी आणि कारवाईची टांगती तलवार ठेवली. हेमंत विश्वशर्मा यांच्या सरकारने आसाम मध्ये सर्व प्रकारच्या जिहादवर अंकुश ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कठोर उपाययोजना केल्यात.

    आसाम मध्ये पैशासाठी हिंदूंची जमीन मुस्लिमांना हस्तांतरित केली. या प्रकरणात बारपेटा मधील महसूल अधिकारी नुपूर बोरा हिला आसाम पोलिसांनी अटक केली. तिची चौकशी आणि तपास केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. त्यानंतर पोलीस आणि महसूल विभागातले अधिकाऱ्यांनी तिच्या घरावर छापा घातला, त्यावेळी तिच्या घरात 92 लाख रुपयांची कॅश आणि दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे सोन्या चांदीचे दागिने आढळले.



    – नुपूर बोराचे कारनामे

    2019 मध्ये नुपूर बोरा आसामच्या महसूल विभागात असिस्टंट कमिशनर म्हणून नोकरीला लागली. त्यानंतर गेल्या सहा वर्षांमध्ये वर उल्लेख केलेली प्रचंड संपत्ती तिने “कमावली”. पण ती “कमावताना” तिने बारपेटा जिल्ह्यात नोकरीला असताना अनेक हिंदू ट्रस्टच्या जमिनी परस्पर मुस्लिम व्यक्तींना किंवा मुस्लिम ट्रस्टना हस्तांतरित केल्या. काही जमिनी विकल्या. त्यांच्या नोंदीमध्ये मोठा फेरफार केला. तिचे सगळे व्यवहार वेगवेगळ्या तक्रारीनंतर स्कॅनर खाली आले. मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी नुपूर बोराच्या सगळ्या व्यवहारांच्या गुप्त चौकशीचे आदेश दिले. नुपूर बोराच्या कारनाम्यांचे हातात पुरावे हातात आल्यानंतर आसाम पोलिसांनी नुपूर बोराला अटक केली. मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी स्वतः ही माहिती दिली. लाचखोरीतून पैसा आणि पैशातून जमिनीचे व्यवहार या सगळ्या प्रकारात नुपूर बोरा लँड जिहाद मध्ये अडकली होती. तिच्याच बरोबर महसूल विभागातले अन्य काही अधिकारी देखील लँड जिहाद मध्ये अडकले आहेत. त्यांची चौकशी आणि तपास सुरू आहे. लँड जिहाद मध्ये दोषी आढळलेल्या एकाही अधिकाऱ्याला अथवा कर्मचाऱ्याला सोडणार नाही, असा इशारा हेमंत विश्वशर्मा यांनी दिला.

    – हिंदूंच्या जमीन विक्रीसाठी नवीन नियम

    हेमंत विश्वशर्मा यांच्या सरकारने आसाम मध्ये जमीन विक्री संदर्भात नुकताच एक नवीन नियम केला. आसाम मध्ये हिंदूंनी अन्य धर्मीयांना जमीन विकली किंवा तिच्या संबंधित कुठल्याही व्यवहार केला तर त्यासाठी सरकारच्या विशिष्ट पडताळणी मधून पार पडावे लागणार आहे. सरकारच्या पडताळणीतून पार पडल्यानंतरच आसाम मध्ये कुठल्याही हिंदूला मुस्लिम किंवा ख्रिश्चन व्यक्तीला किंवा अन्य व्यक्तीला जमीन विकता येणार आहे किंवा तिच्या संदर्भातले व्यवहार करता येणार आहेत. आसाम मध्ये प्रचंड घुसखोरी झाली. आसाम मधल्या सीमावर्ती जिल्ह्यांमधली demography बदलली. अनेक ठिकाणी मुस्लिम बहुसंख्य झाले. या पार्श्वभूमीवर आसाम सरकारने देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कठोर पावले उचलली. त्यापैकी एक पाऊल म्हणजे आसाम मध्ये हिंदूंनी अन्य धर्म यांना जमीन विकण्यासंदर्भात केलेल्या नियमावलीकडे पाहिले जात आहे.

    Revenue officer Nupur Bora locked in land jihad in Assam

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- अनियमितता आढळल्यास SIR रद्द करू; बिहारचा निर्णय तुकड्यांमध्ये देता येणार नाही, संपूर्ण देशात लागू होईल

    Supreme Court स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! राज्य निवडणूक आयाेगाचा सर्वाेच्च न्यायालयात अर्ज

    Unemployment Rate : ऑगस्टमध्ये बेरोजगारी दर 5.1% पर्यंत घसरला; सलग दुसऱ्या महिन्यात घट