कर्नाटकचे मंत्री जमीर यांचा व्हिडिओ उघड; जाणून घ्या नेमकं काय आहे व्हिडीओत
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारच्या एका मंत्र्याचा एक कथित व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भाजपाने शेअर केला आहे. कर्नाटक सरकारमधील मंत्री जमीर अहमद खान यांनी काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी मुस्लीम मतांचे तुष्टीकरण केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. Reveal the Muslim appeasing face of Congress before the Rajasthan elections
जमीर अहमद हे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय मानले जातात. जमीर यांच्या या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितले आहे की, सत्तेत येण्यासाठी त्यांनी भाजपाच्या मुस्लिमांच्या विरोधात असलेल्या धोरणांचा फायदा घेत जमात आणि मौलवींसोबत ६-८ महिने बैठका घेतल्या.
कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारमधील मंत्री जमीर अहमद यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ जारी करताना भाजपने काँग्रेसवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप केला आहे. कर्नाटकच्या मंत्र्याच्या या कथित व्हिडिओमध्ये ते सांगत आहेत की त्यांनी कर्नाटकात काँग्रेसचा विजय कसा निश्चित केला.
काँग्रेस नेते जमीर अहमद यांचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘कर्नाटकमध्ये काँग्रेसला सत्तेत आणून तुम्ही जादू केली आहे, असे लोक म्हणायचे. मला भेटलेल्या प्रत्येकाने विचारले की तुम्ही सर्वांनी संपूर्ण भारताला संदेश देण्यासाठी कसे काम केले? आम्ही काल भेटलेल्या अमीन साहेबांनाही हेच विचारले होते. कर्नाटकात सर्व मुस्लिमांनी एकत्र मतदान कसे केले?
जमीर अहमद यांनी आरोप केला की, ‘कर्नाटकातील मुस्लिम एकजुटीमागील कारण म्हणजे गेल्या साडेतीन वर्षांच्या भाजपच्या राजवटीत मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आले. हिजाबचा मुद्दा असो, लाऊड स्पीकरचा मुद्दा असो की हलाल कटचा मुद्दा असो. भाजपने मुस्लिमांसाठीचे ४% आरक्षण काढून टाकले, जे आमचे वीरप्पा मोईली यांनी १९९३ मध्ये मुख्यमंत्री असताना लागू केले होते.
जमीर व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे की, ‘कर्नाटकचे मुस्लीम या सगळ्याला कंटाळले आहेत आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काय करावे ते समजत नव्हते. मशिदींमध्ये अजानवर बंदी होती. हिजाबवर बंदी असल्याने आमच्या मुली शाळेत जाऊ शकल्या नाहीत. त्यांनी लोकांना हलाल कटच्या दुकानातून मांस विकत घेऊ दिले नाही. हे सगळं करण्याचं कारण काय? मुस्लिमांना त्रास देत असल्याचे खोटे बोलून हिंदू मते मिळवण्याचा भाजपचा हेतू होता.
काँग्रेस नेते जमीर अहमद म्हणाले की, आता इथे (राजस्थानमध्ये) निवडणुका आहेत. काल मी अमीन साहेबांना समजावून सांगत होतो की आपण सर्वांनी एकत्र कसे पुढे जायचे आहे? त्यांच्यावर होणारा अन्याय पाहून आम्ही 6-8 महिन्यांपासून गुप्त बैठका घेत आहोत. आम्ही काय करत आहोत हे आम्ही कोणालाही दाखवत नव्हतो. पण कासिम बाबांना हे चांगलंच माहीत आहे. त्या गुप्त भेटींमध्ये आम्ही जी काही चर्चा करायचो, ती मी कासिम बाबांसोबत शेअर करायचो. आम्ही प्रत्येक मशीद, प्रत्येक मौलवी, प्रत्येक दारुल यांचा विचार केला होता. मला माहीत नाही की इथली परिस्थिती कशी आहे, पण कर्नाटकात आम्ही पहिल्यांदाच जमातसोबत एकत्र काम केलं. मला सांगायचे असेल तर कर्नाटकातील सर्व 224 विधानसभा मतदारसंघात आम्ही काय केले?
Reveal the Muslim appeasing face of Congress before the Rajasthan elections
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation : ”सरकार म्हणून कुठलाही निर्णय घाई गडबडीत घेऊ शकत नाही”, मुख्यमंत्री शिंदेंची स्पष्ट भूमिका!
- world cup 2023 : लंकेचे पुरते पत्ते पिसले, 55 धावांत डाव कोसळला; टीम भारत सेमी फायनल मध्ये!!
- अंगणवाडी सेविकांनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांनाही खुशखबर; दिवाळीत एसटी महामंडळाला 378 कोटींची मदत!!
- मनोज जरांगेंचे उपोषण सुटले; मराठा आरक्षणासाठी सरकारला 2 जानेवारी 2024 पर्यंत दिला वेळ!!