तेलंगण विधानसभेत जुन्या शहराचा विकास, मेट्रो ट्रेन कनेक्टिव्हिटी, कायदा व सुव्यवस्था, वक्फ मालमत्ता आणि निवडणुकीशी संबंधित विषयांवर चर्चा सुरू होती.
विशेष प्रतिनिधी
तेलंगणा : तेलंगणा विधानसभेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याने एक मनोरंजक चर्चा पाहायला मिळाली. काँग्रेस नेते रेड्डी म्हणाले की, मी तुम्हाला उपमुख्यमंत्री बनवतो आणि तुम्हाला माझ्या शेजारी बसवतो. Revanth Reddy offered Akbaruddin Owaisi the post of Deputy Chief Minister kept this condition
प्रत्यक्षात विधानसभेत जुन्या शहराचा विकास, मेट्रो ट्रेन कनेक्टिव्हिटी, कायदा व सुव्यवस्था, वक्फ मालमत्ता आणि निवडणुकीशी संबंधित विषयांवर चर्चा सुरू होती. यावेळी रेड्डी म्हणाले, “माझ्या मित्राने त्याच्या जुन्या मित्राला 10 वर्षे दिली आहेत. मी फक्त चार वर्षे मागतो. जुन्या शहरातून सेवा वाढवण्याची जबाबदारी माझी आहे. प्रकल्प पूर्ण केल्यानंतरच मी मते मागणार आहे.”
चंद्रयानगुट्टा येथील काँग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी त्यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्याकडे पाठिंबा मागितला. एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे चंद्रयांगुट्टाचे प्रतिनिधित्व अकबरुद्दीन ओवेसी करत आहेत. सभागृहात कोणीतरी म्हणाले, ‘चंद्रयांगुट्टामधून काँग्रेसचा उमेदवार जिंकला तर ओवेसीचं काय होईल?’
तर रेवंत रेड्डी म्हणाले, “जर अकबरुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर कोडंगलमधून निवडणूक लढवली तर त्यांचा विजय निश्चित करण्याची जबाबदारी माझी असेल. एवढेच नाही तर मी त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या शेजारी बसवतो.”
रेवंत रेड्डी म्हणाले, “माझा मित्र अकबरुद्दीन ओवेसीला कोणतीही अडचण नाही. जर अकबरुद्दीन ओवेसी काँग्रेसच्या बी फॉर्मवर निवडणूक लढवतील तर मी माझ्या कोडंगलची जागा त्यांच्यासाठी सोडून देईन. मी स्वतः त्यांचा उमेदवारी अर्ज भरेन आणि त्यांचा विजय निश्चित करेन. इतकंच नाही तर मी त्यांना माझ्या शेजारी बसवून उपमुख्यमंत्री बनवणार आहे.
Revanth Reddy offered Akbaruddin Owaisi the post of Deputy Chief Minister kept this condition
महत्वाच्या बातम्या
- Sudhir mungantiwar targets sharad pawar : 7 खासदारांच्या नेत्याला पंतप्रधान सोडा, गृहमंत्री देखील होता येत नाही, तेव्हाच…!
- कुपवाडात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ५ जवान जखमी, एक शहीद
- आरबीआय ग्रेड बी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या, पात्रता काय असावी?
- विधान परिषदेत शेकापचा उमेदवार पडला, मविआतले छोटे पक्ष दुखावले, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा आता स्वबळाचा नारा!!