मुंबई : कोरोना नियंत्रणात आल्यावर महाराष्ट्र सरकारने निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. ही सवलत सध्या 14 जिल्ह्यांसाठी लागू करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई,पुण्याचा समावेश आहे. Restrictions begin to be relaxed in Maharashtra
मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या चौदा जिल्ह्यांत निर्बंध शिथील होतील. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहेत.
14 जिल्ह्यांमध्ये 100 टक्के क्षमतेने जलतरण तलाव, धार्मिक स्थळे आणि मनोरंजन पार्क सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी रेस्टॉरंट्स आणि सिनेमा हॉल 100 टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत. सिनेमा हॉल, बार-रेस्टॉरंट, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळ, नाट्य गृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क याठिकाणी 100 क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे
राज्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने कमी होत आहेत. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतरच राज्य सरकारने महाराष्ट्रातील रेस्टॉरंट, चित्रपटगृह आणि सिनेमागृहांना सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे
Restrictions begin to be relaxed in Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- Nawab Malik ED : नवाब मलिकांचा पाय खोलात; बीकेसीत आढळला 200 कोटींचा भूखंड; उच्च न्यायालयानेही दिला दणका!!
- INDIA-POLAND : जगाने नाकारलं मात्र भारताने स्वीकारलं ! पोलंडला राजाश्रय देणारं संस्थान कोल्हापूर ! दुसऱ्या महायुद्धात पोलंडवासीय पाच वर्ष कोल्हापूरात… गातात वंदे मातरम्
- Nawab Malik ED : नवाब मलिक यांचा मुलगा फराजच्या कंपनीचा बांद्रा – कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये 200 कोटींचा भूखंड; ईडीकडून चौकशी!!
- आरक्षण आणि भरमसाठ देणग्यांमुळे माझ्या मुलाला युक्रेनला जावे लागले; युक्रेनमध्ये प्राण गमावलेल्या नवीनच्या वडिलांची व्यथा