वृत्तसंस्था
चंदीगड : पंजाब मध्ये घटनात्मक राज्य यंत्रणा कोलमडली आहे. या संदर्भात मला राष्ट्रपतींना पत्र लिहावे लागेल, असा स्पष्ट इशारा पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना दिला आहे. Respond or I will write to President, Punjab Governor Banwarilal Purohit warns CM Bhagwant Mann
राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये पंजाब मध्ये राजकीय शीतयुद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या इशाऱ्याला कायदेशीर विशेष महत्त्व आहे.
पंजाब मध्ये कायदा आणि सुव्यवस्था या मुद्द्यावर राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना आत्तापर्यंत अनेक वेळा पत्र लिहून विशिष्ट माहिती मागवली होती. काही खुलासे मागविले होते. घटना कलम 167 नुसार तो राज्यपालांचा अधिकार आहे, असे राज्यपाल पुरोहित यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले होते. परंतु मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यपालांच्या कोणत्याही पत्राला विशिष्ट मुदतीत उत्तर देणे अपेक्षित असताना तसे केले नाही. त्यामुळे राज्यपाल पुरोहित यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना पुन्हा एकदा पत्र पाठवून जुन्या पत्रातील मुद्द्यांची आठवण करून दिली आहे.
राज्यातील कायदा सुव्यवस्था, वाढती ड्रग्स तस्करी आणि त्यावर सरकार नियंत्रण आणू शकलेले नाही याकडे राज्यपाल पुरोहित यांनी आवर्जून लक्ष वेधले आहे. त्याच वेळी त्यांनी आपण या पत्राला उत्तर दिले नाहीत, तर राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून मला नाईलाजास्तव राष्ट्रपतींना रिपोर्ट करावा लागेल. कारण पंजाब मधली घटनात्मक राज्य यंत्रणा कोलमडल्याचे मला स्पष्ट दिसत आहे, असा इशारा राज्यपाल पुरोहित यांनी या पत्रात दिला आहे.
यासाठी त्यांनी लुधियानातील 66 मेडिकल शॉप मधून ड्रग्स विक्रीचे उदाहरण देखील दिले आहे. या संदर्भातल्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतरही राज्य सरकारने दिरंगाईने कारवाई केली. त्यासंदर्भातली विचारणा राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यपालांच्या या पत्राला मुख्यमंत्री भगवंत मान नेमके काय उत्तर देणार आणि ते कायद्याच्या चौकटीत बसेल का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Respond or I will write to President, Punjab Governor Banwarilal Purohit warns CM Bhagwant Mann
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात चर्चा, ‘LAC’वरील तणाव कमी करण्यावर एकमत!
- रॉकेट्री : नंबी इफेक्ट ते द काश्मीर फाइल्स; राष्ट्रीय बाण्याच्या सिनेमांवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची मोहोर!!
- चांदणी चौक : रस्ते चकचकीत, वाहतूक सुरळीत!!
- नरसिंह राव काँग्रेसचे नव्हे, तर भाजपचे पहिले पंतप्रधान; सोनियांच्या उपस्थितीत मणिशंकर अय्यरांचे आरोप बेलगाम!!