• Download App
    Resignation of AAP minister Rajendra Pal Gautam who said not to worship Hindu deities

    हिंदू देवतांची पूजा करू नये सांगणारे आपचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांचा राजीनामा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : गणपती, शंकर, राम, कृष्ण आदी हिंदू देवतांची पूजा करू नये, असे सांगणारे आम आदमी पार्टीचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे पाठवला आहे. राजेंद्र पाल गौतम यांनी दसऱ्याच्या दिवशी एका मेळाव्यात जनतेला आपण हिंदू देवदेवतांची पूजा करणार नाही, अशी शपथ दिली होती. Resignation of AAP minister Rajendra Pal Gautam who said not to worship Hindu deities

    तो कार्यक्रम दिल्लीतील करोल बाग मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा होता. या कार्यक्रमात 10000 जण उपस्थित होते. त्यांना त्यावेळी बौद्ध धर्मगुरूंनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. या दिक्षेच्या कार्यक्रमात आपण हिंदू देवदेवतांची पूजा चर्चा करणार नाही, अशी शपथ होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला त्यावर भाजप सह अनेक पक्षाच्या नेत्यांनी टीकास्त्र सोडले त्यानंतर आता राजेंद्र पाल गौतम यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

    यासंदर्भात त्यांनी एक पत्र लिहिले असून त्यामध्ये त्यांनी संबंधित कार्यक्रमाविषयी खुलासा केला आहे. हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राजरत्न आंबेडकर यांनी आयोजित केला होता. त्यामध्ये बाबासाहेबांनी धम्मचक्र परावर्तन दिन जी प्रतिज्ञा 22 प्रतिज्ञा घेतल्या होत्या, त्यांचेच वाचन आपण केले. आपण बाबासाहेबांच्या अनुयायी होतो आणि यापुढेही राहू, असे राजेंद्र पाल गौतम यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

    त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांनी आपल्याला सन्मान दिला आहे. परंतु, आपल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर कोणतेही राजकीय संकट ओढवू नये, असेही राजेंद्र पाल गौतम यांनी या पत्रात लिहिले आहे. दसऱ्याच्या दिवशीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक मनुवादी संघटना आणि लोकांनी मला आणि माझ्या कुटुंबीयांना इजा करण्याच्या धमक्या दिल्या. परंतु अशा धमक्यांना आपण घाबरत नाही. आपण बौद्ध धर्माचे अनुयायी आहोत. मनुवाद्यांचा प्रतिकार करत राहू, असेही राजेंद्र पाल गौतम यांनी या पत्राच्या अखेरीस स्पष्ट केले आहे.

    Resignation of AAP minister Rajendra Pal Gautam who said not to worship Hindu deities

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!