महाराष्ट्रामध्ये निवासी डॉक्टर साध्या साध्या सुविधांसाठी आंदोलनाचा इशारा देत आहेत. मात्र, गुजरातमध्ये निवासी डॉक्टरांना खरा कोरोनायोध्दा मानून पाच हजार रुपये अतिरिक्त कोविड भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. १३ हजार रुपये विद्यावेतनाशिवाय हा भत्ता मिळणार आहे. Resident doctors in Gujarat will get Rs 5,000 covid allowance
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : महाराष्ट्रामध्ये निवासी डॉक्टर साध्या साध्या सुविधांसाठी आंदोलनाचा इशारा देत आहेत. मात्र, गुजरातमध्ये निवासी डॉक्टरांना खरा कोरोनायोध्दा मानून पाच हजार रुपये अतिरिक्त कोविड भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. १३ हजार रुपये विद्यावेतनाशिवाय हा भत्ता मिळणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयांत निवासी डॉक्टर गेल्या वर्षभरापासून कोरोनाशी लढत आहेत. त्यांच्याच जीवावर येथील रुग्णसेवा सुरू आहे. महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांना त्यांचे विद्यावेतनही नियमित मिळत नाही. त्याचबरोबर कमी मनुष्यबळामुळे हे डॉक्टर मेटाकुटीस आले आहेत. दुसऱ्या बाजुला गुजरातमध्ये निवासी डॉक्टरांना सर्व सुविधांसह आता पाच हजार रुपये भत्ताही मिळणार आहे.
गुजरातमध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये सुमारे तीन हजार निवासी हॉक्टर आहेत. या डॉक्टरांनी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्याकडे मागणी केली होती. की त्यांच्या विद्यावेतनामध्ये वाढ करण्यात यावी. याचे कारण म्हणजे त्यांच्या वेतनात २०१८ मध्ये वाढ झाली नव्हती. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मुख्यमंत्री रुपानी यांनी विद्यावेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने हा निर्णय घेतला असताना गुजरातमधील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मात्र पुरेसे वेतन मिळत नाही. कारण त्यांना सर्व मिळून केवळ पाच हजार रुपये वेतन मिळत आहे. मात्र, त्यांना बारा तासांची ड्युटी करावी लागत आहे. एका निवासी डॉक्टरने सांगितले की आम्ही ९० डॉक्टर १६ एप्रिलला दुपारी तीन वाजल्यापासून आंदोलनाला सुरूवात केली आहे. आम्ही यासंदर्भात डीनना पत्रही लिहिले आहे. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
Resident doctors in Gujarat will get Rs 5,000 covid allowance
महत्वाच्या बातम्या वाचा
- भारताचे ज्युनिअर चार्ली चॅप्लिन विवेक यांचे तमिळनाडूत निधन
- क्युबामधील तब्बल सहा दशकांच्या कॅस्ट्रो युगाची अखेर, राऊल कॅस्ट्रो यांचा राजीनामा
- निवडणूक काळात तमिळनाडूत पकडली ४४६ कोटींची दारू; तर पाच राज्यांत हजार कोटींचा ऐवज जप्त!
- देशभरात आतापर्यंत तब्बल ७४७ डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू , सर्वाधिक बळी तमिळनाडूत
- दिल्ली आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय लोकदल उभारणार स्मारक