आरोग्य मंत्रालयाकडून हे स्टिकर्स व्हाट्सअॅपवर अधिकाधिक शेअर करण्याची विनंती
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एखादी गोष्ट जनते पर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मिडीया एक प्रभावी माध्यम आहे. त्यातल्या त्यात व्हाट्स अॅप सर्वाधिक वापरले जाते. त्यामुळे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoH&FW) देखील या संकटात देशातील नागरिकांचे मनोबल वाढविण्यासाठी सोशल मिडीयाचा आधार घेतला आहे. Request from the Ministry of Health to share these stickers on WhatsApp ; Read more
लोकांना जागरूक करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे, ज्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांना आवाहन करण्यात आले आहे.
कोविड -19 च्या केसेस देशभरात वाढत आहेत. अशा परिस्थितीत घरी राहणे, मास्क घालणे, सामाजिक अंतर इत्यादी आवश्यक झाले आहेत. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर एक पोस्ट टाकत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (एमओएच अँड एफडब्ल्यू) व्हॉट्सअॅप स्टिकर्स तयार केले आहेत.तसेच नागरिकांना हे व्हॉट्सअॅप स्टिकर्स वापरण्याची विनंती केली आहे आणि ते आपल्या मित्रांसह आणि कुटुंबासह शेअर करण्याची विनंती देखील केली आहे. यातून कोरोना टाळण्यासाठी लोकांना योग्य पद्धती अवलंबण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकते.
हे स्टिकर विनामूल्य डाउनलोड करू शकता. आता असे म्हणतात की या स्टिकर्समध्ये काहीतरी खास आहे ज्यासाठी आरोग्य मंत्रालयाने लोकांना सामायिक करण्याचे आवाहन केले.
Tap to download stickers
http://sticker.ly/s/Z3YCQY
व्हॉट्सअॅपने नवीन वर्षाच्या सुरूवातीला व्हॅक्सिन फॉर ऑल नावाचं एक स्टिकर पॅक लॉन्च केलं. Android आणि iOS दोन्ही वापरकर्ते हे स्टिकर पॅक डाउनलोड करू शकतात.
या विशेष स्टिकर पॅकमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने डिझाइन केलेले 23 भिन्न स्टिकर्स आहेत. या सर्व स्टिकर्सकडे कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचे इमोजी आहेत. हे स्टिकर्स व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी खास बनवले गेले आहेत जे लोकांना कोरोनाबद्दल जागरूक करण्याचे काम करीत आहेत.
डब्ल्यूएचओने डिझाईन केलेल्या पॅकमध्ये एकूण 23 स्टिकर्स
डब्ल्यूएचओने डिझाईन केलेल्या ‘Vaccines for All’ स्टिकर पॅकमध्ये एकूण 23 स्टिकर्स आहेत. कंपनीने याचे लाँच करताना म्हटले की, आम्हाला आशा आहे की या स्टिकर्सद्वारे लोक एकमेकांशी संपर्क साधू शकतील. आपण कोविड -19 लस आल्याचा आनंद, उत्साह आणि त्याचबरोबर मनामध्ये चालू असलेले विचार खाजगीरित्या शेअर करण्यात सक्षम असाल.