विशेष प्रतिनिधी
मणीपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष आणि निळा झेंडा मणीपुरी जनतेने मनापासून स्वीकारला आहे. मणीपूर विधानसभा निवडणुकीत रिपब्लिक पक्षाचे 9 उमेदवार निवडणूक रिंगणात असून यंदा रिपब्लिकन पक्ष मणीपूर विधानसभेत निश्चित खाते उघडणार आहे. Republican party to open account in Manipur assembly Union Minister of State Ramdas Athavale believes
रिपब्लिकन पक्षाचे जे उमेदवार निवडून येतील ते सर्व भाजपला पाठिंबा देतील. येथील केसोथाँग या विधानसभा मतदार संघातील रिपाइंचे उमेदवार महेश्वर थाऊनाऊजाम यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
मणीपूर विधानसभा निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आठवले तीन दिवसांच्या मणीपूर दौर्यावर आले आहेत. आज केसोथाँग विधानसभा मतदार संघात रिपब्लिकन पक्षाची प्रचार रॅली काढण्यात आली. त्या रॅलीचे भव्य प्रचारसभेत रूपांतर झाले.
यावेळी केसोथाँग मतदार संघाचे उमेदवार महेश्वर थाऊनाऊजाम यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन आठवले यांनी केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला, ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे, रिपाइं सचिव आस्मा बेगम, कृष्णा अय्यर असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
महेश्वर थाऊनाऊजाम हे मणीपुरी चित्रपट सृष्टीचे सुप्रसिध्द अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. रिपब्लिकन पक्षाचे राज्य अध्यक्ष आहेत. त्यांनी गतवर्षी कोरोनाच्या कठीण काळात स्थानिक जनतेला मोठी मदत केली होती. गरीब जनतेला मोफत अन्नधान्य, औषधे, सॅनिटायझर, मास्क आदींचे मोफत वाटप केले आहे.
त्यामुळे स्थानिक जनता थाऊनाऊजाम यांच्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे या निवडणुकीत मणीपूर विधानसभेत महेश्वर थाऊनाऊजामच्या रूपाने रिपब्लिकन पक्षाचा आमदार निवडून येईल आणि मणीपूर विधानसभेत रिपब्लिकन पक्षाचे खाते उघडले जाईल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
Republican party to open account in Manipur assembly Union Minister of State Ramdas Athavale believes
महत्त्वाच्या बातम्या
- 5 दिवसांत 11 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज
- Good food good life : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा अफलातून मेनू ! तळलेले पदार्थ बंद – आयुर्वेदिक खिचडी – बनाना समोसा – रागी शिरा! आरोग्यदायी संकल्पना …
- Water taxi service : मुंबईत आजपासून वॉटर टॅक्सी सेवा सुरू, मुंबई ते बेलापूर हा प्रवास अवघ्या ३० मिनिटांत होणार
- चांदीवाल आयोगासमोर हजर झाल्यानंतर नवाब मलिक म्हणाले – सत्याचा विजय होणार! अँटिलिया प्रकरणाचे सत्य बाहेर येईल!