दहशतवाद्यांच्या धमक्यांमुळे आतापर्यंत श्रीनगर येथील लाला चौकातील ‘क्लॉक टॉवर’ वर कधीच तिरंगा फडकावला नाही.Republic Day: For the first time in 75 years, the tricolor was hoisted on the ‘Clock Tower’ at Lal Chowk in Srinagar
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाचा उत्साह देशभरात पाहायला मिळणार आहे.यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा हा स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात साजरा होत आहे, हे वर्ष देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्हणून साजरे केले जात आहे. विशेष म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षानंतर पहिल्यांदाच श्रीनगर येथील लाल चौकातील ‘क्लॉक टॉवर’ वर तिरंगा फडकावला व राष्ट्रगीत गायलं आहे.
दहशतवाद्यांच्या धमक्यांमुळे आतापर्यंत श्रीनगर येथील लाला चौकातील ‘क्लॉक टॉवर’ वर कधीच तिरंगा फडकावला नाही. त्यामुळे आजचा दिवस हा ऐतिहासिक मानावा लागणार आहे.तसेच यावेळी भारत माता की जय ! म्हणत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी मोठ्या संख्येने स्थानिक तरूणांसह महिला आणि लहान मुले उपस्थित होते.
कलम 370 हटवल्यानंतर आणि दहशतवाद्यांवर केल्या जाणाऱ्या कारवायांमुळे श्रीनगर येथील स्थानिक युवक समोर येत आहे.तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काश्मिरमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काही ठिकाणी शार्प शूटर देखील तैनात करण्यात आले होते.तसेच रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे नजर ठेवली जाते.
Republic Day: For the first time in 75 years, the tricolor was hoisted on the ‘Clock Tower’ at Lal Chowk in Srinagar
महत्त्वाच्या बातम्या
- Republic Day : नागपुरात दिव्यांग मुलीने अंबाझरी तलावात केले ध्वजारोहण
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारा तूर्त तरी कोणताच नेता नाही; सध्या मतदान झाले तर मोदीच मोदींना पर्याय
- भोपाळ : तिरंगा प्रिंटेड विकले शूज , अमेझॉन विक्रेत्यावर FIR दाखल ; गृहमंत्री मिश्रा यांनी दिले कारवाईचे निर्देश
- जळगावमध्ये एसटी कर्मचऱ्यांच कुटुंबासह ‘भीक मांगो’ आंदोलन
- तिरंगी सजावटीत रंगला सावळा विठुराया , तब्बल 750 किलो फुलांनी केली सजावट
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वोच्च न्यायालयाच्या १३ न्यायाधीशांसह ४०० कर्मचारी पॉझिटिव्ह, सरन्यायाधीशांनी दिली माहिती