चीनमध्ये उइघर मुस्लिमांवरील अत्याचाराशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रत्यक्षात या उइघर मुस्लिमांच्या अवयवांचा काळाबाजार करून चीनने अब्जावधी रुपये कमावल्याचा दावा एका वृत्तात करण्यात आला आहे. Reports Says China Sells Uyghur Muslim Organs In Black Markets And Earn Billion Rupees
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : चीनमध्ये उइघर मुस्लिमांवरील अत्याचाराशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रत्यक्षात या उइघर मुस्लिमांच्या अवयवांचा काळाबाजार करून चीनने अब्जावधी रुपये कमावल्याचा दावा एका वृत्तात करण्यात आला आहे. ‘हेराल्ड सन’ या वृत्तपत्रातील वृत्तानुसार, येथे सुमारे दीड लाख लोकांना बळजबरीने तुरुंगात डांबण्यात आले आहे. बंदिवासात या मुस्लिमांच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव जसे की, मूत्रपिंड आणि यकृत जबरदस्तीने काढून त्यांचा काळाबाजार केला जात आहे.
1 कोटी 20 लाख रुपयांना निरोगी यकृताची विक्री
मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथील एका मॉर्निंग टॅब्लॉइडच्या वृत्तात चीन निरोगी यकृत विकून सुमारे 12 दशलक्ष रुपये कसे कमावतो आणि या व्यापारातून दरवर्षी सुमारे 75 अब्ज रुपये कमावतो याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. विशेष म्हणजे, चीनमधील डिटेन्शन सेंटरमध्ये मानवी अवयवांचा काळाबाजार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. चीनवर यापूर्वीही अनेकदा असे आरोप झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग (UNHRC) ने सांगितले की, मानवी हक्क तजज्ञ उइघुर, तिबेटी, मुस्लिम आणि ख्रिश्चनांसह अल्पसंख्याकांच्या अवयवांच्या तस्करीमुळे चिंतेत आहेत.
उइगर मुस्लिमांची लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी चीनची नवी रणनीती
चीनने शिनजियांग प्रांतातील उईघुर लोकसंख्येवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी नवीन अंतर्गत आणि बाह्य यंत्रणा विकसित केली आहे. किमान 10 उइघुर कुटुंबांच्या देखरेखीसाठी जबाबदार असणार्या व्यवस्थापकांना समाविष्ट करण्यासाठी एक नवीन प्रणाली तयार केली गेली आहे. त्याचप्रमाणे चीन सध्या तिबेटवर आपले विशेष लक्ष केंद्रित करत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे त्यांच्यावर नेहमीच बारीक नजर ठेवली जाते. ते राहत असलेल्या भागातून बाहेर जाण्यासही त्यांना मनाई करण्यात आली असून या भागातून बाहेर जाता येणार नाही यासाठी अनेक ठिकाणी अडथळेही लावण्यात आले आहेत. शिनजियांग आणि तिबेट या दोन्ही प्रांतांमध्ये मानवी हक्कांचे घोर उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
त्याच वेळी, द संडे मॉर्निंग हेराल्डमध्ये लिहिताना, एरिक हॅगशॉ म्हणाले की, तिबेट आणि शिनजियांगमध्ये अटकेची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे, कारण चीनचे संपूर्ण लक्ष या दोन प्रांतांवर आहे. चीनला आपली संस्कृती इथे लादायची आहे, जेणेकरून उइगर आणि तिबेटी लोकांची धार्मिक ओळख संपुष्टात येईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्पसंख्याकांची धार्मिक स्थळे त्यांना अगोदर न कळवता नष्ट केली जात आहेत.
Reports Says China Sells Uyghur Muslim Organs In Black Markets And Earn Billion Rupees
महत्त्वाच्या बातम्या
- डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा खटला अखेर सुरू ; शुक्रवारी खटल्यातील पहिल्या साक्षीदाराची साक्ष नोंदवली
- मुंबई ड्रग्स प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविला जाण्याची शक्यता ?
- कोरोनाने निधन झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार २५ हजार रुपये; पिंपरी- चिंचवड पालिकेचा निर्णय
- भारतीय नौदलाची वाढली ताकद, दोन ‘ALH Mk 3’ हेलिकॉप्टर ताफ्यात दाखल