वृत्तसंस्था
राजनंदगाव : दिल्लीचे रिपीटेशन राजनंदगाव मध्ये झाले आहे. दिल्लीत जशी केजरीवाल सरकार मधील मंत्री अरविंद राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थितीत जनसमुदायाला हिंदू देवी, देवतांविरुद्ध शपथ दिली होती, तशीच शपथ राजनंदगाव मध्ये काही बौद्ध धर्मगुरूंनी जनसमुदायाला दिली आहे. Repetition of Delhi in Chhattisgarh’s Rajnandgaon
गणपती देवी अथवा कोणत्याही हिंदू देवदेवतांना आपण मानणार नाही. त्यांची पूजाअर्चा करणार नाही. कोणत्याही देवाने अवतार घेतला हे आपल्याला मान्य नाही, अशी शपथ काही धर्मगुरूंनी जनसमुदायाला दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. राजनंदगाव मधल्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि महापौर छाया देशमुख उपस्थित होत्या.
दिल्लीमध्ये राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थितीत हिंदू देवदेवतांच्या विरोधातली शपथ दिल्यानंतर राजेंद्र पाल गौतम यांना राजीनामा द्यावा लागला होता आम आदमी पार्टीने त्यांच्यावर ही कारवाई केली होती. आता छत्तीसगडच्या नंदगाव मधील कार्यक्रमानंतर छाया देशमुख यांच्याविरुद्ध काँग्रेस पक्ष काय कारवाई करतो?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Repetition of Delhi in Chhattisgarh’s Rajnandgaon
महत्वाच्या बातम्या
- राजकीय स्तर खालावल्याचे राष्ट्रवादीचे राज्यपालांना पत्र; अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला राष्ट्रवादी महिला नेत्याचे 10 लाखांचे बक्षीस
- 18000 पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात; नियमांमध्ये महत्त्वाचे बदल
- वडिलांच्या पावलावर मुलाचे पाऊल; न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड आज होणार देशाचे 50 वे सरन्यायाधीश
- राजकीय नेत्यांच्या (अ)सभ्यतेच्या मर्यादा