• Download App
    तीनही कृषी कायदे रद्द; एक पाऊल मागे घेत मोदींनी पंजाब, युपीचा मार्ग केला मोकळा!!; विरोधक नवा मुद्दा आणणार कुठून??Repeal of all three agricultural laws; Modi takes a step back in Punjab

    तीनही कृषी कायदे रद्द : एक पाऊल मागे घेत मोदींनी पंजाब, युपीचा मार्ग केला मोकळा!!; विरोधक नवा मुद्दा आणणार कुठून??

    नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार्तिक पौर्णिमा गुरुनानक जयंतीच्या प्रकाश परवाच्या निमित्ताने देशातले तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करत एक पाऊल मागे घेतले आहे. यामुळे कृषी कायद्यांच्या सर्व विरोधकांना अत्यानंद होऊन आपला विजय झाल्याचे वाटत असले तरी प्रत्यक्षात मोदींनी फक्त एक पाऊल मागे घेत भाजपसाठी पंजाब आणि उत्तर प्रदेशाचा मार्ग मोकळा करून घेतला आहे. याला सामरिक नीतीच्या भाषेत “सक्सेसफुल रिट्रीट” असे म्हणतात…!! याचा अर्थ पुढची मोठी झेप घेण्यासाठी एक पाऊल मागे घेणे आणि योग्य वेळेची वाट पाहणे.Repeal of all three agricultural laws; Modi takes a step back in Punjab

    पंतप्रधान मोदींच्या भाषणांमध्ये अनेक बाबी अशा होत्या की ज्या त्यांनी स्पष्टपणे पंजाब हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश इथल्या शेतकऱ्यांना थेट संबोधित करणाऱ्या होत्या. एक प्रकारे त्यांनी देशातल्या शेतकरी आणि पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी यांच्यातला भेदच अधोरेखित केला. छोट्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या अनेक उपाययोजनांचे विरोधक नेमके कोण आहेत?, हे त्यांनी स्पष्ट करून सांगितले. त्याच वेळी येत्या संसदेच्या अधिवेशनात तीन कृषी कायदे मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया करण्यात येईल तसेच झिरो बजेट शेती अर्थात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात येतील, ही नवी घोषणा देखील यानिमित्ताने केली आहे. याची समिती लवकरात लवकर तयार करून नव्या कृषी धोरणाची अंमलबजावणी करण्याची तयारी देखील मोदी सरकारने केली आहे आणि इथेच मोदींच्या भाषणातील खरी मेख आहे…!!



    तीन कृषी कायद्यांवरून घेतलेली माघार ही अंतिम माघार नाही, तर मोदींनी सगळ्यात शेवटी केलेल्या झिरो बजेट शेतीमध्ये अर्थात नैसर्गिक शेतीच्या प्रोत्साहतून देशातील संपूर्ण पीक पॅटर्नमध्ये बदल करण्याचे सुतोवाच पंतप्रधानांनी केले आहे. पंजाब हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश इथला पीक पॅटर्न आणि देशभरातला अन्य राज्यांटमधला पॅटर्न यासंदर्भातले हे महत्त्वाचे भाष्य आहे. हे पीक पॅटर्न बदलणे यातून कृषी कायद्यांमधल्या अनेक गोष्टी वेगळ्या भाषेत राहू शकतात हेच त्यांनी सूचित केले आहे.

     

    पण यातला महत्त्वाचा राजकीय भाग पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका संदर्भातला आहे. मोदींनी आजच्या भाषणातून या दोन राज्यांमध्ये विरोधकांच्या हातातला महत्त्वाचा मुद्दा किंवा महत्त्वाचे शस्त्र काढून घेतले आहे. या कृषी कायदे तर रद्द केले. विरोधकांना भाजपला विरोध करण्यासाठी आता नवा मुद्दा शोधावा लागणार आहे. नवा मुद्दा शोधून त्यावर आंदोलन उभे करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे आणि हे सगळे उभे राहीपर्यंत पंजाब, उत्तर प्रदेश मधल्या विधानसभा निवडणुका होऊन जाणार आहेत. म्हणजे इथे देखील मोदीने एक प्रकारे एक पाऊल मागे घेत विरोधकांवर मात केल्यास दिसते. कारण विरोधकांच्या प्रत्येक सभेमध्ये कृषी कायद्यांचा मुद्दा हा पुढे आणता आला असता तोच आता मागे पडणार आहे आणि त्याच वेळी भाजपकडून अनेक शस्त्रे या निवडणुकीत वापरली गेल्यानंतर त्याचा मुकाबला कसा करायचा याची रणनीती विरोधकांना आखावी लागणार आहे.

    एक प्रकारे पंतप्रधान मोदींनी आजच्या भाषणातून विरोधकांकडे खऱ्या अर्थाने नवे आव्हानच निर्माण केले आहेत आणि ते आव्हान मोदी सरकारला विरोध करण्यासाठी नवा मुद्दा शोधण्याचे आहे.

    Repeal of all three agricultural laws; Modi takes a step back in Punjab

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य