• Download App
    Renuka chaudhary कुत्र्यापायी सत्ता गेली, तरी काँग्रेस नेत्यांची जिरली नाही मस्ती; कॅमेऱ्यासमोर भुंकल्या रेणुका चौधरी!!

    कुत्र्यापायी सत्ता गेली, तरी काँग्रेस नेत्यांची जिरली नाही मस्ती; कॅमेऱ्यासमोर भुंकल्या रेणुका चौधरी!!

    नाशिक : कुत्र्यापायी सत्ता गेली, तरी काँग्रेस नेत्यांची जिरली नाही मस्ती; कॅमेऱ्यासमोर भुंकल्या रेणुका चौधरी!!, असेच चित्र संसदेच्या परिसरात दिसले. Renuka chaudhary

    संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी संसदेच्या आवारात आपले पाळीव कुत्रे घेऊन आल्या होत्या. संसदेच्या आवारात असा पाळीव प्राणी आणणे नियमबाह्य असल्याने तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रतिबंध केला. त्यावर संसदेबाहेर भुंकायला बंदी आहे, पण आत मध्ये जाऊन कुणीही भुंकू शकते, आत मध्ये भुंकणारे सत्ता चालवत आहेत, अशी शेरेबाजी रेणुका चौधरी यांनी केली. काँग्रेसच्या सदस्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला.

    रेणुका चौधरी कॅमेऱ्यासमोर भुंकल्या

    पण रेणुका चौधरी यांच्या विरुद्ध जोरदार गदारोळ झाला. त्यांच्याविरुद्ध विशेष अधिकार भंग आणायचा निर्णय सरकारच्या बाजूने घेतला गेला. पण तरी देखील रेणुका चौधरी यांची मस्ती गेली नाही. त्या आज संसदेच्या आवारात आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना कुत्रा प्रकरणावरून सवाल केला, त्यावेळी त्या कॅमेरा समोर भुंकल्या. सरकारला जो काही ठराव आणायचा आहे, तो आणू द्यात. मी घाबरत नाही. अटल बिहारी वाजपेयी हे संसदेच्या आवारात बैलगाडी घेऊन आले होते, मग मी इथे कुत्रा आणला, तर काय बिघडले??, असा उलटा सवाल त्यांनी केला. पण अटल बिहारी वाजपेयी पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलन करताना बैलगाडी घेऊन आले होते, तर त्या स्वतः केवळ सरकारला डिवचण्यासाठी कुत्रा घेऊन आल्या होत्या, हे सत्य त्या विसरल्या. सनातन संस्कृतीत कुत्र्याचे महत्त्व किती आहे याचा पाठ त्यांनी पढवला.



    कुत्र्यापायी काँग्रेसने एक महत्त्वाचा नेता आणि एका राज्यातली सत्ता गमावली, हे राजकीय सत्य सुद्धा रेणुका चौधरी यांच्या लक्षात आले नाही.

    – आसाम मध्ये सत्ता गेली, तरी…

    आसामचे सध्याचे मुख्यमंत्री हेमंट विश्वशर्मा ही मूळचे काँग्रेसचे नेते. त्यांनी आसाममध्ये काँग्रेससाठी भरपूर काम केले. तरुण गोगोई यांच्या सत्ता काळात त्यांना मदत केली. आसाम मध्ये काँग्रेस संघटना वाढविण्यासाठी खस्ता खाल्ल्या. पण हेमंत विश्वशर्मा ज्यावेळी आसाम काँग्रेस मधल्या काही समस्या सांगायला राहुल गांधींना भेटले, त्यावेळी राहुल गांधी त्या समस्या ऐकून घेण्याऐवजी आपल्या पाळीव कुत्र्याला बिस्किटे खायला घालत बसले होते. त्यांनी हेमंत विश्वशर्मा यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. त्यामुळे हेमंत विश्वकर्मा चिडले. ते राहुल गांधींच्या घरातून निघून गेले. नंतर त्यांनी काँग्रेस सोडली. भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपची संघटना वाढवली. हेमंत विश्वशर्मांच्या काँग्रेस मधून बाहेर पडल्याचे नुकसान काँग्रेसला सोसावे लागले. काँग्रेसची आसाम मधली सत्ता गेली. हेमंत विश्वशर्मांनी भाजपची सत्ता तिथे आणली. एका कुत्र्याच्या प्रेमापायी हे घडले.

    – वाजपेयींचा अस्थानी हवाला

    पण काँग्रेसच्या नेत्यांचे कुत्रा प्रेम कमी झाले नाही. ते संसदेच्या आवारात येऊन पोहोचले. त्याच्यावर कडी करत काँग्रेस नेत्यांनी कॅमेरासमोर भुंकण्याची मस्ती केली. वर रेणुका चौधरी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थानी हवाला द्यायला कमी केले नाही.

    Renuka chaudhary barked infront of media camera

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    New Zealand : भारत-न्यूझीलंड दरम्यान मुक्त व्यापार करार; भारतात येणारे अर्ध्याहून अधिक सामान आता शुल्कमुक्त

    जैन कुंभमेळा णमोकार तीर्थक्षेत्रासाठी 36.35 कोटींचा सुधारित आराखडा मंजूर; फेब्रुवारी 2026 मध्ये कुंभमेळा

    इम्रान मसूद यांनी प्रियांका गांधींची सोंगटी पुढे ढकलली; त्याच दिवशी राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाची “भविष्यवाणी” झाली!!