वयाच्या ८६ व्या वर्षी घेतलाअखेरचा श्वास
विशेष प्रतिनिधी
पुणे : प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे आज(मंगळवार) पुण्यात निधन झाले आहे. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला होता. भारताचं आजचं खगोलशास्त्राचं जे संशोधन आणि प्रगती आहे त्यामध्ये जयंत नारळीकर यांचा महत्त्वाचा वाटा होता.
जयंत नारळीकर यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले होते. नंतर पुढील शिक्षणासाठी ते केंब्रिज विद्यापिठात गेले होते. त्यानंतर ते भारतात परतले आधी टाटा मुलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. 2021मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही राहिले होते.
जयंत नारळीकर यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारतीय विज्ञानातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले डॉ. नारळीकर हे विश्वविज्ञानातील त्यांच्या अग्रगण्य योगदानासाठी, विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी आणि देशात प्रमुख संशोधन संस्था स्थापन करण्यासाठी प्रसिद्ध होते.
Renowned astronomer Jayant Narlikar passes away
महत्वाच्या बातम्या
- Lashkar-e-Taiba : पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा दहशतवादी सैफुल्ला खालिदची हत्या!
- Solapur fire tragedy : सोलापूर आग दुर्घटना : पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून पीडितांना आर्थिक सहाय्य
- Hyderabad हैदराबादमध्ये बॉम्बस्फोटाचा कट उधळला, आयसिसशी संबंधित दोन जणांना अटक
- YouTuber Priyanka Senapati : ज्योती मल्होत्रा हेरगिरी प्रकरणात ओडिशातील यूट्यूबर प्रियांका सेनापती संशयाच्या भोवऱ्यात