विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे 25 नोव्हेंबरच्या मुंबईतल्या संविधान रॅलीसाठी प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींना बोलविले आहे, पण दुसरीकडे तेलंगणात मात्र प्रचारात आंबेडकरांचे जुने साथीदार असदुद्दीन ओवैसी यांनी मात्र काँग्रेसचे काँग्रेसचा रिमोट कंट्रोल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे असल्याची टीका केली आहे.Remote control of Congress and Sangh says owaisi
महाराष्ट्रात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण असा संघर्ष पेटला असताना प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईतल्या शिवाजी पार्कवर 25 नोव्हेंबर रोजी संविधान रॅली आयोजित केली आहे. या रॅलीसाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्याचे घाटत आहे. या रॅलीतून शरद पवारांचे नाव मात्र वगळलेले दिसत आहे.
पण एकीकडे प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींना जरी संविधान बचाव रॅलीसाठी बोलवले असले, तरी दुसरीकडे त्यांचेच एक जुने साथीदार खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मात्र राहुल गांधी ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात, त्या काँग्रेसच्या रिमोट कंट्रोल सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याकडे आहे, असे वक्तव्य केले आहे.
तेलंगणात काँग्रेसने भारत राष्ट्र समिती आणि असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष एमआयएम यांना भाजपची बी टीम म्हटले आहे. त्यावरच पलटवार करताना ओवैसी यांनी काँग्रेसचे तेलंगण प्रदेशाध्यक्ष संघाचे स्वयंसेवक आहेत आणि काँग्रेसवर मोहन भागवतांचा रिमोट कंट्रोल चालतो, असा आरोप केला आहे. एकेकाळी एकमेकांचे साथीदार असलेल्या प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची परस्पर विसंगत मते या निमित्ताने समोर आली आहेत.
Remote control of Congress and Sangh says owaisi
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची??,पवारांची की अजितदादांची??; आज सोमवारपासून नियमित सुनावणी!!
- रोहितच्या डोळ्यात अश्रू, भारतभर सन्नाटा; पंतप्रधान मोदींचे मनोधैर्य उंचावणारे ट्विट!!
- भारताच्या किरकोळ आव्हानाच्या सामन्यात डोके शांत ठेवून “हेड” लढला; ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप घेऊन गेला!!
- उत्तरकाशीमधील बोगद्यात ८ दिवसांपासून अडकून आहेत ४१ मजूर, गडकरी-धामींनी घेतला आढावा, म्हणाले…