• Download App
    रेमडेसिवीर खरेदी करताय, हे सहा पी लक्षात ठेवा, हैद्राबादच्या पोलीसा आयुक्तांचे आवाहन|Remember these six P's when buying on RedDesive, the appeal of the Commissioner of Police of Hyderabad

    रेमडेसिवीर खरेदी करताय, हे सहा पी लक्षात ठेवा, हैद्राबादच्या पोलीसा आयुक्तांचे आवाहन

    कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिवीर इंजेक्श्नची गरज भासत आहे. मात्र, या इंजेक्शनचा तुटवडा भासू लागल्यामुळे त्याचा काळाबाजारही होत आहे. यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करताना हे सहा पी लक्षात ठेवा असे आवाहन हैद्राबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी केले आहे.Remember these six P’s when buying on RedDesive, the appeal of the Commissioner of Police of Hyderabad


    विशेष प्रतिनिधी

    हैद्राबाद : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिवीर इंजेक्श्नची गरज भासत आहे. मात्र, या इंजेक्शनचा तुटवडा भासू लागल्यामुळे त्याचा काळाबाजारही होत आहे. यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करताना हे सहा पी लक्षात ठेवा असे आवाहन हैद्राबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी केले आहे.

    हैद्राबादमध्ये बनावट रेमडेसिवीर विकणाऱ्या चाळीस जणांना आत्तापर्यंत पकडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अंजनी कुमार यांनी म्हटले आहे की प्लेस (ठिकाण), प्रिस्क्रिप्शन (डॉक्टरांची चिठ्ठी) , प्रॉमीसेस (वचन),प्राईस (किंमत), प्रायव्हसी (खासगीपणा) आणि प्रॉडक्ट (उत्पादन) या सहा पींना लक्षात ठेवण्यास सांगितले आहे.



    त्यांनी म्हटले आहे की प्लेस म्हणजे ठिकाण महत्वाचे आहे. कोणत्याही अज्ञात वेबसाईटवरून किंवा अनोळखी व्यक्तीकडून इंजेक्शन खरेदी करू नका. प्रिस्क्रिप्शन म्हणजे डॉक्टरांच्या सल्याशिवाय खरेदी करू नका.

    प्रॉमीस म्हणजे कोणत्याही अनाठायी दाव्याला भुलू नका आणि या इंजेक्शनचा उपयोग आत्तापर्यंत सिध्द झालेला नाही. प्राईस म्हणजे किंमत. एमआरपीनुसारच इंजेक्शन खरेदी करा. जास्त पैसे मागितल्यास तातडीने पोलीसांना कळवा.

    प्रायव्हसी म्हणजे इंजेक्शन खरेदी करताना तुमचे ओळखपत्र किंवा तुमच्या सोशल मीडियाचा पासवर्ड देऊ नका. सर्वात शेवटचे म्हरजे प्रॉडक्ट म्हणजे उत्पादन. वापरात असलेले इंजेक्शनच खरेदी करा.

    हैद्राबाद पोलीसांनी बनावट रेमडेसिवीर विकल्याप्रकरणी आत्तापर्यंत अनेकांना पकडले आहे. त्यामध्ये मेडीकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि मेडीकल दुकान मालकांचा समावेश आहे.

    Remember these six P’s when buying on RedDesive, the appeal of the Commissioner of Police of Hyderabad

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!