remdesivir import : देशात कोरोना महमारीमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणार्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची कमतरतादेखील देशात कायम आहे. एवढेच नव्हे तर गेल्या अनेक दिवसांपासून या इंजेक्शनच्या ब्लॅक मार्केटिंगच्या बातम्याही ऐकायला मिळाल्या. देशातील रेमडेसिव्हिरची कमतरता दूर करण्यासाठी आता भारत सरकारने इतर देशांमधून रेमडेसिव्हिर या महत्त्वाच्या औषधाची आयात करण्यास सुरुवात केली आहे. 75000 कुप्यांची पहिली खेप आज भारतात पोहोचेल, अशी माहिती भारत सरकारने दिली. remdesivir import started; first consignment of 75000 vials will reach India today
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात कोरोना महमारीमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणार्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची कमतरतादेखील देशात कायम आहे. एवढेच नव्हे तर गेल्या अनेक दिवसांपासून या इंजेक्शनच्या ब्लॅक मार्केटिंगच्या बातम्याही ऐकायला मिळाल्या. देशातील रेमडेसिव्हिरची कमतरता दूर करण्यासाठी आता भारत सरकारने इतर देशांमधून रेमडेसिव्हिर या महत्त्वाच्या औषधाची आयात करण्यास सुरुवात केली आहे. 75000 कुप्यांची पहिली खेप आज भारतात पोहोचेल, अशी माहिती भारत सरकारने दिली.
एचएलएल लाइफकेयर लिमिटेड या भारत सरकारच्या मालकीच्या कंपनीने गिलियड सायन्सेस इंक. यूएसए आणि इजिप्शियन फार्मा कंपनी, ईव्हा फार्माच्या 4,50,000 कुप्यांची ऑर्डर दिली आहे. गिलियड सायन्सेस इंक यूएसए येत्या एक-दोन दिवसांत 75,000 ते 1 लाख कुप्या भारतात पाठवेल, अशी आशा आहे.
दरम्यान, सध्या देश अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे. कोरोनाच्या लाटेने अनेक बळी घेतले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तीन लाखांहून अधिक रुग्णांची सातत्याने नोंद होत आहे. याबरोबरच मृतांच्या वाढत्या संख्येनेही चिंता वाढवली आहे.
remdesivir import started; first consignment of 75000 vials will reach India today
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारकडून 258.74 लाख मेट्रिक गव्हाची एमएसपीवर 51 हजार कोटी रुपयांत खरेदी
- प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कोरोनाची झाली होती लागण
- देशाचे माजी अटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनाने निधन; राष्ट्रपती, पंतप्रधानांसह सुप्रीम कोर्टानेही व्यक्त केला शोक
- ‘रॉबिनहूड बनू नका’, दिल्लीहून रेमडेसिव्हिर खरेदीप्रकरणी हायकोर्टाने खा. सुजय विखेंना खडसावले
- WATCH : रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडेल, आमदार असल्याची लाज वाटतेय, उद्विग्न आप आमदाराचे दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचे आवाहन