120 ते 135 किलोमीटर वेगाने वादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात मान्सूनचा परिणाम दिसू लागला आहे. 19 मे रोजी अंदमान आणि निकोबारमधून मान्सूनने प्रवेश केला आणि त्यासोबतच बंगालच्या प्रदेशात रेमाल चक्रीवादळ निर्माण झाले, जे पश्चिम बंगालच्या दिशेने सरकले आहे. हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार, बंगालमध्ये वादळाचा प्रभाव दिसू लागला आहे. 120 ते 135 किलोमीटर वेगाने वादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर आज रात्री धडकेल.Remal Chakravarti beats NDRF deployed in Bengal alert in Jharkhand too
बंगालमध्ये सध्या ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. ममता बॅनर्जी सरकारने खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. लोकांना सतर्क करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या 12 तुकड्या राज्याच्या किनारी भागात तैनात करण्यात आल्या आहेत. 5 अतिरिक्त टीम स्टँडबाय मोडवर ठेवण्यात आल्या आहेत. लोकांना आणि मच्छिमारांना समुद्र किनाऱ्यावर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच रात्रीच्या वेळी घरातच राहण्याच्या सूचना आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीमध्ये चक्रीवादळामुळे पावसामुळे 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. झाडे उन्मळून पडल्याने व घरांची पडझड झाल्याने 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 26 ते 28 मे दरम्यान पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 1.5 मीटर उंच लाटा येऊ शकतात, ज्यामुळे सखल भागात पूर येऊ शकतो.
Remal Chakravarti beats NDRF deployed in Bengal alert in Jharkhand too
महत्वाच्या बातम्या
- 6 राज्यांत उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट; उष्णतेमुळे राजस्थानमध्ये 2 दिवसांत 13 जणांचा मृत्यू
- 8 राज्यांतील 58 जागांवर 58.82% मतदान; बंगालमध्ये BJP उमेदवारावर हल्ला, पक्षाचा TMC वर आरोप
- चीनची तैवानला युद्धाची धमकी; म्हटले- जोपर्यंत तैवान आमचा भाग होत नाही, तोपर्यंत लष्करी कारवाई करत राहू
- राजकोटच्या गेम झोनमध्ये अग्नितांडव, तब्बल 24 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये 12 मुले; DNA टेस्टद्वारे पटवणार ओळख