वृत्तसंस्था
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील 6 आरोपींची उर्वरित शिक्षा सुप्रीम कोर्टाने माफ करून त्यांना तुरुंगातून सोडून देण्याचे आदेश दिले आहेत. नलिनी श्रीहरन, आर. पी. रविचंद्रन, संथन, मुरुगन, रॉबर्ट पायस आणि जयाकुमार अशी या आरोपींची नावे आहेत. Remaining sentence of 6 accused in Rajiv Gandhi assassination case
नलिनी ही आधी पॅरोलवर बाहेर आली आहे. एक अन्य आरोपी ए. जी. पेरारिवलन याची उर्वरित शिक्षा सुप्रीम कोर्टाने 18 मई 2022 रोजी माफ केली होती. तोच आधार म्हणून सुप्रीम कोर्टाने अन्य 6 आरोपींची शिक्षा देखील माफ केली आहे. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती बी.वी. नागरत्ना यांच्या खंडपीठाने 6 आरोपींची उर्वरित शिक्षा माफ करून त्यांना तुरुंगातून सोडून देण्याचे आदेश दिले.
राजीव गांधी हत्याकांडाचा इतिहास
राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूतील श्रीपेरंबदूर येथे काँग्रेसच्या प्रचार सभेत लिबरेशन टायगर ऑफ तमिल इलमच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून हत्या केली होती.
या हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने 1999 मध्ये चार दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती, तर अन्य तीन दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती 2000 मध्ये नलिनीची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. तर बाकीच्या तीन आरोपींची फाशीची शिक्षा 2014 मध्ये जन्मठेपेत बदलण्यात आली. यापैकी पेरारीवलन याला 18 मे 2022 रोजी तुरुंगातून सोडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.
सर्व आरोपींची 30 वर्षांपेक्षा अधिक तुरुंगवासाची शिक्षा भोगून झाली आहे. त्यामुळे सर्व आरोपींना सुप्रीम कोर्टाने घटनेतील कलम 142 नुसार आपल्या विशेष अधिकाराचा वापर करत तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले आहेत.
Remaining sentence of 6 accused in Rajiv Gandhi assassination case
महत्वाच्या बातम्या
- अल्पसंख्याक विद्यार्थी कर्ज योजना : देशात २० लाख, तर परदेशी शिक्षणासाठी ३० लाख मिळणार
- घराणेशाहीवरून भारत छोडो यात्रेवर टीकेचा भडीमार, पण काँग्रेस नेत्यांचे मोदी टार्गेटवरच कॉन्सन्ट्रेशन
- विशाळगड, लोहगडासह अन्य गडांवरील अतिक्रमणेही हटवा; संभाजीराजेंची सूचना
- टीआरपी कमी झालेले लोक भारत जोडो यात्रेत जातात; प्रकाश आंबेडकरांचे पुन्हा शरसंधान