• Download App
    धार्मिक हिंसाचाराची मोठी घटना नाहीच, मोदी सरकारच्या काळात सरकारी नोकरीत मुस्लिमांचे प्रमाण ६ टक्यांनी वाढले|Religious violence is not a big issue, during the Modi government, the proportion of Muslims in government jobs increased by 6%

    धार्मिक हिंसाचाराची मोठी घटना नाहीच, मोदी सरकारच्या काळात सरकारी नोकरीत मुस्लिमांचे प्रमाण ६ टक्यांनी वाढले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळात एकही मोठी धार्मिक हिंसाचाराची घटना घडली नाही. अल्पसंख्यांकांविषयी कोणताही भेदभाव केला जात नाही. २०१४ पर्यंत सरकारी नोकरीत मुस्लिमांचे प्रमाण चार टक्के होते. ते गेल्या सात वर्षांत सहा टक्यांनी वाढून दहा टक्के झाले असल्याचे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाला ठणकावून सांगितले.Religious violence is not a big issue, during the Modi government, the proportion of Muslims in government jobs increased by 6%

    सहा सदस्यीय एव शिष्टमंडळात मानवाधिकार विशेष प्रतिनिधी इमॉन गिलमोर आणि युरोपियन युनियनचे भारतातील राजदूत उगो अस्तुटो यांचा समावेश होता. त्यांनी नक्वी यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि देशातील अल्पसंख्याकांवर होत असलेल्या भेदभावाबाबत चिंता व्यक्त केली.



    यावेळी त्यांना ठणकावून सांगताना नक्कवी म्हणाले, भारतात अल्पसंख्याकांविरुद्ध कोणताही भेदभाव केला जात नाही. केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील अल्पसंख्याकांची टक्केवारी 2014 मध्ये 4 टक्क्यांपेक्षा कमी होती. ती आता लक्षणीयरीत्या वाढून 10 टक्क्यांहून अधिक झाली आहे.

    सरकारकडून कोणत्याही भेदभावाशिवाय सन्मानाने सर्व समुदायांसाठी सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरण केले जाते. गेल्या सात-आठ वर्षांत जातीय हिंसाचाराची एकही मोठी घटना घडलेली नाही मोदी सरकारने धर्म, जात किंवा समुदायाचा विचार न करता गुन्हेगारांवर कठोर आणि प्रभावी कारवाई केली आहे, असे नक्वी यांनी सांगितले.

    Religious violence is not a big issue, during the Modi government, the proportion of Muslims in government jobs increased by 6%

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील