• Download App
    ट्रस्ट मिळकत विक्रीसाठी विश्वस्तांना दिलासा Relief to trustees for sale of trust property

    ट्रस्ट मिळकत विक्रीसाठी विश्वस्तांना दिलासा

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : कायद्याने तसेच विविध न्यायनिर्णयांच्या अनुषंगाने अभिप्रेत असलेल्या चतुःसुत्रीचा विश्वस्तांनी अवलंब केला असेल तर ट्रस्ट मिळकत विक्रीकामी धर्मादाय आयुक्तांनी पूर्वपरवानगी देण्याच्या उचित निर्णय घ्यावा. ट्रस्ट मिळकतीची विक्री करण्याची कायदेशीर गरज असल्याबाबत विश्वस्तांचा ठराव झाल्यावर अशा विक्रीतून येणाऱ्या मोबदल्यातून ट्रस्टच्या उद्दीष्टांना पूरक कार्य होणार असेल व मिळकत विक्रीतून सर्वोत्तम मूल्य ट्रस्टला मिळत असेल तर या व्यवहाराची वैधता तपासून मिळकत विक्रीस परवानगी देता येईल. ट्रस्ट मिळकत विक्रीसाठी उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. Relief to trustees for sale of trust property

    ट्रस्ट मिळकत विक्रीसाठी उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे एक ठोस मार्गदर्शक प्रणाली मिळाल्यामुळे राज्यभरातील विभागीय सह धर्मादाय आयुक्तांकडून पूर्वपरवानगी प्रक्रिया जलदगतीने होईल अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणे अध्यक्ष ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार यांनी व्यक्त केली.

    नागपूर येथील एका ट्रस्टच्या दूर अंतरावर असलेल्या शेतजमिनींची विश्वस्तांना योग्य प्रकारे देखभाल करता येत नसल्याने त्या जमिनींची विक्री करायला परवानगी देण्याचा अर्ज तेथील सह धर्मादाय आयुक्तांनी दोन वेळा फेटाळला होता. या निर्णयाच्या विरोधात दाखल रीट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या जमिनींची विक्री करायला परवानगी देण्याचा निर्णय दिला आहे.

    न्या. अविनाश घरोते यांनी आपल्या निकालपत्रात ट्रस्ट मिळकत विक्रीची कायदेशीर गरज व योग्य कारणे याबाबत मीमांसा करताना काही निकष निकालपत्रात नमूद केले आहेत. त्यानुसार ट्रस्टच्या जमिनी खूप दूर अंतरावर असतील व त्यांची वहिवाट व संरक्षण करणे विश्वस्तांना अशक्य होत असेल. अशा मिळकतींवर अतिक्रमण होण्याची दाट शक्यता असेल किंवा झाल्यामुळे ताबा मिळवण्यासाठी विश्वस्तांना कोर्टकचेरीत गुंतून पडावे लागणार असेल. ट्रस्टची इमारत खूप जुनी व जीर्ण होऊन त्याची दुरूस्ती अथवा पुनःनिर्माण अपुऱ्या निधी अभावी अशक्य असेलअसेल तर विक्री शक्य आहे.

    ट्रस्ट मिळकतीमधून अतिशय तुटपुंजे उत्पन्न प्राप्त होत असल्यास किंवा इतर काही कारणांमुळे त्या मिळकतीचा ट्रस्टला फायदा होणार नसेल. तसेच मिळकत विक्री शिवाय ट्रस्टची उद्दिष्ट साध्य करण्यास इतर काही पर्यायच नसेल तर या परिस्थितीचा सर्वंकष विचार करून विक्री परवानगीची मागणी योग्य असेल असा अभिप्राय निकालपत्रात नमूद केला आहे. तसेच प्रत्येक ट्रस्टची मिळकत विक्रीची गरज ही वेगवेगळी असू शकते. अशी आवश्यकता तपासून त्यानुसार कार्यवाही करावी असेही निर्देश दिले आहेत.

    Relief to trustees for sale of trust property

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!