प्रतिनिधी
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने आर्थिक निकषावर आधारित आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 % आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या या निकालाचे देशभरातून स्वागत झाले आहे. या निकालावरून आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. relief to economically weaker sections of the society; Amit Shah’s reaction on reservation validity
न्यायालयाच्या निर्णयामुळे आनंद
सर्वोच्च न्यायालयाने EWS आरक्षण घटनात्मदृष्ट्या वैध ठरवले हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे. पण काळाबरोबरच याबाबतचे नियम आणि कायदे देखील बदलणे गरजेचे आहे. समाजातील सर्व घटकांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयाला काही लोकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. पण सुप्रीम कोर्टाने सरकारचा 130 व्या घटनादुरुस्तीचा निर्णय उचलून धरला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
सुप्रीम कोर्टाने योग्य तो निकाल देत हा निर्णय कायम कायम ठेवला याचा मला अत्यंत आनंद आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना स्वतंत्र 10 % आरक्षण देणे हे घटनेच्या मुलभूत चौकटीला कुठेही धक्का लावत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना दिलासा मिळणार
आपल्याकडे कोणतीही सुविधा नाही, कोणतीही व्यवस्था नाही, मीसुद्धा आर्थिकदृष्ट्या मागासच आहे, अशी भावना समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या मनात होती. अशा घटकांचा विचार करुनच मोदी सरकारने बिगर आरक्षित जातींना आर्थिक निकषांच्या आधारावर 10 % आरक्षण लागू केले, यामुळे समाजातील अशा घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे, असेही अमित शाह यांनी यावेळी म्हटले आहे.
relief to economically weaker sections of the society; Amit Shah’s reaction on reservation validity
महत्वाच्या बातम्या
- टीव्ही 9 चे पत्रकार कै. पांडुरंग रायकरचे कुटुंब अजूनही सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलेल्या मदतीच्या प्रतीक्षेत
- मुंबईतील इंटरनॅशनल हलाल शो इंडिया रद्द करा; हलाल सक्तीविरोधी कृती समितीचे आंदोलन
- नोकरीची संधी : भारतीय पोस्ट खात्यात 98083 पदांची मेगाभरती; फक्त 10 उत्तीर्णतेची अट
- 3 पुस्तके लिहून जिहादी दहशतवादाची चिरफाड करणारे इंटेलिजन्स ब्युरो अधिकारी आर. एन. कुलकर्णींची म्हैसुरूमध्ये हत्या