वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार रजनी पाटील यांच्यावरील निलंबनाची कारवाई सभापतींनी मागे घेतली आहे. सदनातील गोंधळाचा एक व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप पाटील यांच्यावर होता. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी 10 फेब्रुवारीला त्यांना निलंबित केले होते.Relief to Congress MP Rajni Patil, suspension lifted; Modi’s video in Parliament went viral
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला होता. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून रजनी पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांचे निलंबन दबावात केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला होता.
हे निलंबन रद्द करण्याचा प्रस्ताव विशेषाधिकार समितीने सोमवारी मांडला. सभागृहात व्हिडिओ शूट करून पाटील यांनी विशेषाधिकारांचे उल्लंघन केले. या प्रकरणी त्या चार महिन्यांपासून निलंबित असून त्यांचे निलंबन ही शिक्षा मानली जावी असे समितीने म्हटले.
निलंबनाची कारवाई मागे घेतल्यानंतर रजनी पाटील यांनी सभागृहाच्या मर्यादेनुसार काम करू अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Relief to Congress MP Rajni Patil, suspension lifted; Modi’s video in Parliament went viral
महत्वाच्या बातम्या
- फडणवीस मस्टर मंत्री नव्हे, तर मास्टर ब्लास्टर मंत्री; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
- माफिया अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन फरार घोषित ; पोलिसांनी घरही केले जप्त
- आम्ही आणीबाणी लादण्यासाठी किंवा पंतप्रधानांचे पद वाचवण्यासाठी घटनादुरुस्ती करत नाही; अमित शाहांचा काँग्रेसला टोला
- ज्ञानवापीचे सत्य बाहेर येताना नेमाडे बुद्धीचा सत्यापलाप; आऊटडेटेड प्रौढांच्या खेळात महाराष्ट्राचे वाटोळे!!