कोरोनामुळे कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीचा बळी गेला तर संपूर्ण कुटुंबावर आकाश कोसळते. आर्थिक संकटे येतात. त्यामुळेच रिलायन्स कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. रिलायन्सच्या एखाद्या कर्मचाऱ्याचा कोविडमुळे मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना पुढची पाच वर्षं त्या कर्मचाऱ्याच्या शेवटच्या पगाराएवढी रक्कम मिळत राहील. त्याच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च रिलायन्स उचलणार आहे.Reliance will pay five years salary to the families of the deceased employees and also pay for the education of the children.
विशेष प्रतिनिधी
मुबंई : कोरोनामुळे कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीचा बळी गेला तर संपूर्ण कुटुंबावर आकाश कोसळते. आर्थिक संकटे येतात. त्यामुळेच रिलायन्स कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
रिलायन्सच्या एखाद्या कर्मचाऱ्याचा कोविडमुळे मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना पुढची पाच वर्षं त्या कर्मचाऱ्याच्या शेवटच्या पगाराएवढी रक्कम मिळत राहील. त्याच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च रिलायन्स उचलणार आहे.
रिलायन्सच्या वतीने मुकेश आणि नीता अंबानी यांनी ही घोषणा केली आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मंचाऱ्याच्या जोडीदार आणि मुलं तसंच पालकांच्या हॉस्पिटलायझेशन पॉलिसीचा प्रीमिअम रिलायन्सच्या वतीने भरण्यात येईल.
मुलांचे पदवीपर्यंतचं शिक्षण होईपर्यंत हा लाभ मिळेल.जे कर्मचारी थेट रिलायन्स इंडस्ट्रीजचे नाहीत परंतु त्यांच्यासाठी काम करतात अशा ऑफ रोल कर्मचाºयांसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने आणखी मोठी घोषणा करण्यात आली आहे.
थेट रिलायन्स इंडस्ट्रीजचे कर्मचारी नसलेल्या ऑफ रोल कर्मचाऱ्यापैकी कुणाचा कोरोनाने मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या आप्तांना 10 लाखांची मदत देण्यात येणार आहे. ही मदत रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येईल, असे फौंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी यांनी सांगितले.
Reliance will pay five years salary to the families of the deceased employees and also pay for the education of the children.
महत्त्वाच्या बातम्या
- सुनील गावस्कर म्हणतात…मी आणि सचिनपेक्षाही हा मोठा भारतीय आयकॉन
- फरार चोक्सी लवकरच गजाआड, चोक्सीच्या लंडनच्या वकिलांचे दावे डॉमिनिक कोर्टाने फेटाळले
- PF मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, आता 3 दिवसांत होईल EPF क्लेम सेटेलमेंट, जाणून घ्या प्रोसेस
- SBIच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, आता बदलली ब्रांच उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ