• Download App
    भारतातील बेस्ट एम्प्लॉयर ठरली रिलायन्स, फोर्ब्सच्या जागतिक टॉप 50च्या यादीत एकही भारतीय कंपनी नाही । reliance industries tops indian corporates in forbes world best employers rankings

    भारतातील बेस्ट एम्प्लॉयर ठरली रिलायन्स इंडस्ट्रीज, फोर्ब्सच्या जागतिक टॉप 50च्या यादीत एकही भारतीय कंपनी नाही

    Forbes World Best Employers Rankings : फोर्ब्सने जारी केलेल्या 2021 साठी जगातील सर्वोत्तम एम्प्लॉयरच्या ‘फोर्ब्स वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर – 2021’ यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) भारतामध्ये अव्वल स्थानावर आहे. तथापि, कोणतीही भारतीय कंपनी जगातील टॉप 50 नियोक्त्यांच्या यादीत स्थान मिळवू शकली नाही. reliance industries tops indian corporates in forbes world best employers rankings


    वृत्तसंस्था

    मुंबई : फोर्ब्सने जारी केलेल्या 2021 साठी जगातील सर्वोत्तम एम्प्लॉयरच्या ‘फोर्ब्स वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर – 2021’ यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) भारतामध्ये अव्वल स्थानावर आहे. तथापि, कोणतीही भारतीय कंपनी जगातील टॉप 50 नियोक्त्यांच्या यादीत स्थान मिळवू शकली नाही.

    फोर्ब्स रँकिंगनुसार रिलायन्स जागतिक स्तरावर 52 व्या स्थानावर आहे. जगातील एकूण 750 कॉर्पोरेट्सना या यादीत स्थान देण्यात आले आहे. यादीनुसार, दक्षिण कोरियाचा सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स जगातील पहिल्या 5 सर्वोत्तम नियोक्त्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अनुक्रमे आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन आणि अॅपल या चार अमेरिकन कंपन्या आहेत.

    या आहेत टॉप भारतीय कंपन्या

    रिलायन्सनंतर आयसीआयसीआय बँक 65व्या स्थानावर, एचडीएफसी बँक 77 व्या स्थानावर आणि एचसीएल टेक्नॉलॉजी जगातील सर्वोत्तम नियोक्त्यांच्या यादीत 90 व्या स्थानावर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया 119व्या आणि लार्सन अँड टुब्रो 127व्या, तर इन्फोसिस 588व्या आणि टाटा ग्रुप 746 व्या क्रमांकावर आहे. तर एलआयसी 504 व्या क्रमांकावर आहे.

    कशी झाली रँकिंग?

    ही क्रमवारी सर्वसमावेशक सर्वेक्षणावर आधारित आहे, ज्यामध्ये कर्मचारी त्यांच्या नियोक्त्यांना अनेक गुणांवर रेट करतात. फोर्ब्सने जगातील सर्वोत्तम नियोक्त्यांची वार्षिक यादी संकलित करण्यासाठी मार्केट रिसर्च कंपनी स्टॅटिस्टासोबत सहकार्य केले आहे. रँकिंग निश्चित करण्यासाठी, स्टॅटिस्टाने बहुराष्ट्रीय कंपन्या आणि संस्थांमध्ये काम करणाऱ्या 58 देशांतील 1.5 लाख कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले.

    या यादीतील दुसरे ते सातवे स्थान अमेरिकन कंपन्यांच्या ताब्यात आहे. यामध्ये IBM, Microsoft, Amazon, Apple, Alphabet आणि Dell Technology सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ 8 व्या क्रमांकावर हुआवे आहे, जी पहिल्या 10 मध्ये एकमेव चिनी कंपनी आहे.

    reliance industries tops indian corporates in forbes world best employers rankings

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!