• Download App
    कर्नाटक हायकोर्टाने म्हटले- परपुरुषाशी संबंध असलेल्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही |Relationship with foreign husband, wife has no right to alimony; The Karnataka High Court said

    कर्नाटक हायकोर्टाने म्हटले- परपुरुषाशी संबंध असलेल्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही

    वृत्तसंस्था

    बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात म्हटले आहे की, दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या महिलेला तिच्या पतीकडून पोटगी घेण्याचा अधिकार नाही. जेव्हा एखादी स्त्री आपल्या पतीशी प्रामाणिक नसते तेव्हा तिचे भरणपोषण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.Relationship with foreign husband, wife has no right to alimony; The Karnataka High Court said

    एका महिलेच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती राजेंद्र बदामीकर यांनी हे भाष्य केले. चिक्कमंगलुरूच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला महिलेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, ज्यामध्ये तिला भरपाई न देण्याचा आदेश देण्यात आला होता.



    आपण कायदेशीर विवाहित असल्याचा दावा महिलेने केला आहे. अशा स्थितीत तिला देखभाल भत्ता मिळायला हवा. महिलेने पतीवर अनैतिक संबंधांचा आरोपही केला आहे. त्यावर हायकोर्टाने म्हटले की, जेव्हा एखाद्या महिलेचे स्वतःचे चारित्र्य चांगले नसते तेव्हा ती आपल्या पतीकडे बोट दाखवू शकत नाही.

    महिला शेजाऱ्यासोबत राहायला लागली

    वास्तविक, पतीने कोर्टात सांगितले की, ती महिला शेजाऱ्यासोबत पळून गेली होती. तिने पतीसोबत राहण्यास नकार दिला होता. 2009 मध्ये महिलेने घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत याचिका दाखल केली होती. यामध्ये तिने पतीकडून 25 हजार रुपयांच्या दंडासह दरमहा 3000 रुपये देखभाल भत्ता देण्याची मागणी केली होती.

    हायकोर्टाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला

    13 मार्च 2013 रोजी दंडाधिकाऱ्यांनी महिलेच्या पतीला 5000 रुपयांच्या दंडाव्यतिरिक्त दरमहा 2500 रुपये भरणपोषण भत्ता देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला पतीने सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. 6 नोव्हेंबर 2015 रोजी सत्र न्यायालयाने न्यायदंडाधिकाऱ्यांचा निर्णय रद्द केला. कर्नाटक उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत महिलेची याचिका फेटाळून लावली.

    Relationship with foreign husband, wife has no right to alimony; The Karnataka High Court said

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan drones : पाकिस्तानचे सर्व ड्रोन उद्ध्वस्त, १०० हून अधिक दहशतवादी ठार

    Karachi port : कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी भारतीय नौदल होते सज्ज

    ‘सर्व भारतीय वैमानिक परतले आहेत’, ऑपरेशन सिंदूरवर एअर मार्शलचे मोठे विधान