• Download App
    दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधी, ईडीचे पथक पोहचले केजरीवालांच्या घरी! |Regarding the Delhi liquor scam the ED team reached Kejriwals house

    दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधी, ईडीचे पथक पोहचले केजरीवालांच्या घरी!

    केजरीवाल यांना आज दुपारी दिल्ली उच्च न्यायालयातून दणका बसला, आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणात मोठी बातमी येत आहे. उच्च न्यायालयाकडून दणका दिल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आहे. एसीपी दर्जाचे अधिकारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.Regarding the Delhi liquor scam the ED team reached Kejriwals house



    केजरीवाल यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्ली मद्य घोटाळ्याची ईडी चौकशी करत आहे. ईडीचे तपास अधिकारी केजरीवाल यांची चौकशी करत आहेत. त्यांच्या घराचीही झडती घेतली जात आहे.

    दरम्यान, केजरीवाल यांची कायदेशीर टीम सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. केजरीवाल यांची टीम उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. अरविंद केजरीवाल यांना आज दुपारी दिल्ली उच्च न्यायालयातून दणका बसला. अटक रोखण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.

    Regarding the Delhi liquor scam the ED team reached Kejriwals house

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत

    SC Examines : जज कॅश प्रकरण, सुप्रीम कोर्टाने म्हटले- संसदीय चौकशी पॅनेलमध्ये त्रुटी; आधी याची गांभीर्यता ठरवू, मग निर्णय