वृत्तसंस्था
सिवान : बिहारमध्ये मदरशांच्या सुधारणेला राज्य सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापुढेही असेच प्राधान्य देऊन मदरशांसाठी होस्टेल आणि डिग्री कॉलेज बांधण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिले आहे. Reform of madrasas in Bihar is a priority for the government
नितीश कुमार यांनी समाधान दौऱ्यात सिवान मधील सोनबरसा येथे मदरसा इस्लामिया अरबिया नैराना, येथे भेट देऊन मदरशाचे निरीक्षण केले. तिथल्या सोयी सुविधांविषयी माहिती घेतली. मदरशांच्या सुधारणांसाठी राज्य सरकार सतत काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. मदरशांमधील मौलाना आणि शिक्षकांना वेतन दिले जात नव्हते.
ते सरकारने सुरू केले आहे. आता मदरशांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांसाठी होस्टेलही बांधण्यात येईल. त्याचबरोबर डिग्री कॉलेज देखील उभारून मदरशाचे विस्तारीकरण करण्यात येईल, असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. मदरशांमध्ये विज्ञान, कॉम्प्युटर सायन्स वगैरे विषय शिकवण्याची सोय करण्याचे आवाहन त्यांनी केले
राज्य सरकारच्या विविध योजना जमिनीस्तरावर किती उतरले आहेत याचे निरीक्षण करण्यासाठी नितेश कुमार यांनी समाधान दौरा आखला आहे भाजपशी युती तोडून लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करून सरकार बदलल्यानंतर त्यांनी प्रथमच मदरसा सुधारणां संदर्भात भाष्य केले आहे.
Reform of madrasas in Bihar is a priority for the government
महत्वाच्या बातम्या