• Download App
    'लाल डायरी'चा उल्लेख करत अमित शहा यांनी गेहलोत सरकारला लगावला टोला, म्हणाले... Referring to Lal Diary Amit Shah attacked the Gehlot government

    ‘लाल डायरी’चा उल्लेख करत अमित शहा यांनी गेहलोत सरकारला लगावला टोला, म्हणाले…

    अशोक गेहलोत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी, असं आव्हानही दिलं.

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : गंगापूर  सिटीमध्ये इफ्कोतर्फे आयोजित ‘सहकार किसान संमेलन’ कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर निशाणा साधला आहे. यासोबतच जनतेला संबोधित करताना 2024 च्या निवडणुकीबाबतही घोषणाबाजी करण्यात आली. या परिषदेत ते म्हणाले की 2024 मध्ये फक्त मोदींनाच पंतप्रधान बनवायचे आहे. Referring to Lal Diary Amit Shah attacked the Gehlot government

    सभेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, राजस्थानचे शेतकरी म्हणतात  राज्यात वीज उपलब्ध नाही त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत अशोक गेहलोत सरकारवर ताशेरे ओढत शहा म्हणाले की, घरात कोणतीही डायरी असू शकते, पण तिचा रंग लाल ठेवू नका. अन्यथा गेहलोतजी नाराज होतील. लाल डायरीची खिल्ली उडवत ते म्हणाले की, आजकाल राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत लाल डायरीला खूप घाबरतात, पण ते का घाबरतात? कारण लाल डायरीत काळे कारनामे दडलेले असतात. लाल डायरीत करोडोंच्या भ्रष्टाचाराचा तपशील आहे.

    ‘सहकार किसान संमेलन’ कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांनी अशोक गेहलोत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी, असे खडे बोल सुनावले.  तर, या कार्यक्रमाच्या सुरुवातीला काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. या संदर्भात समाचार घेत शह म्हणाले की, गेहलोत यांनी काही लोकांना पाठवले आहे. जे काही काळ त्यांचा कार्यक्रम करून परततील. त्यांना घोषणा देऊ द्या. ते स्वतःच थकतील आणि स्वतःहून परततील.

    Referring to Lal Diary Amit Shah attacked the Gehlot government

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला