• Download App
    weight of gas घरगुती गॅस सिलेंडर मधल्या गॅसच्या वजनात घट??; तसला कोणताही प्रस्ताव नाही, मोदी सरकारचा खुलासा!!

    घरगुती गॅस सिलेंडर मधल्या गॅसच्या वजनात घट??; तसला कोणताही प्रस्ताव नाही, मोदी सरकारचा खुलासा!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धात गॅस टंचाई निर्माण झाल्याने केंद्र सरकारने कठोर उपाययोजना करून घरगुती गॅस सिलेंडर मधल्या गॅसच्या वजनात घट करून त्याचा पुरवठा करण्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रातल्या मोदी सरकारने स्पष्ट खुलासा केला असून तसा कोणताही प्रस्ताव सरकार पुढे नसल्याचे सरकारी प्रवक्त्यांनी नमूद केले. याचा अर्थ घरगुती गॅस पूर्वीच्याच आहे त्या वजनात म्हणजे 14.5 किलोग्रॅम एवढा मिळणार आहे. weight of gas

    अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धात गॅस टंचाई निर्माण झाली. भारतभर ग्राहकांनी त्यास वितरण केंद्रांवर रांगा लावल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संसदेमध्ये या संदर्भात सविस्तर निवेदन सादर केले. गॅस टंचाई आणि इंधन टंचाई होऊ नये यासाठी केंद्र सरकारने तब्बल 42 देशांमधून इंधन आयातीला सुरुवात केली आहे. आतापर्यंत भारत 23 देशांमधून वेगवेगळ्या प्रकारची इंधने खरेदी करत होता पण त्यांचा पार्श्वभूमीवर भारताने आपले आयातीचे जाळे वाढवून 42 देशांमधून इंधन आयातीला सुरुवात केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

    पण याच दरम्यान घरगुती गॅस सिलेंडर मधल्या गॅसचे वजन घटवून गॅस सिलेंडरचे वितरण होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरल्या. गॅस सिलेंडर मधील गॅसची वेगवेगळी वजने लोकांनी हवी तशी वापरून त्या बातम्या सगळीकडे पसरवल्या.

    पण मोदी सरकारने या संदर्भात स्पष्ट खुलासा करून गॅसचे वजन घटवून सिलेंडरचे वितरण करायचा कुठलाही प्रस्ताव सरकार समोर नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचे वजन 14.5 किलोग्रॅम जसेच्या तसे कायम राहिल्याचे देखील स्पष्ट झाले.

    Reduction in the weight of gas in domestic gas cylinders

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nripendra Mishra : अयोध्येत कारसेवकांवर गोळी कोणी चालवली? माजी आयएएस म्हणाले- 90 टक्के निर्णय राजकीय; अखिलेश यादवांना प्रत्युत्तर

    महिला आरक्षण 2029 मध्येच लागू करण्यासाठी विरोधकांचा आग्रह; संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी मोदींचा political twist!!

    Jairam Ramesh : काँग्रेसने म्हटले- सरकारला जात जनगणना थांबवायची आहे; जयराम रमेश म्हणाले- महिला आरक्षणातील बदलामुळे देशाची दिशाभूल