तेल कंपन्यांनी दिली नववर्षाची भेट, महिनाभरात दुसऱ्यांदा कपात
विशेष प्रतिनिधी
नवा दिल्ली : सरकारी तेल आणि वायू कंपन्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जनतेला मोठी भेट दिली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी (1 जानेवारी) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केल्याची माहिती दिली. अशाप्रकारे महिनाभरात दुसऱ्यांदा एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे. Reduction in price of LPG cylinders
सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑईल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत ही कपात केली आहे. मात्र, यावेळी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत झालेली कपात अगदीच किरकोळ आहे.
विविध शहरांमध्ये आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत दीड रुपयांनी कमी झाली आहे, तर 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
हैदराबादच्या कराची बेकरीत गॅस सिलिंडरचा स्फोट:15 जण जखमी, 6 चिंताजनक
प्रमुख शहरांमध्ये नवीन किंमती
या कपातीनंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1,755.50 रुपये झाली आहे. यापूर्वी ते 1,757 रुपयांना उपलब्ध होते. अशाप्रकारे दिल्लीतील भाव दीड रुपयांनी कमी झाले आहेत. चेन्नईमध्ये सर्वाधिक 4.50 रुपयांची कपात झाली आहे, जिथे 19 किलोचा सिलिंडर आता 1,924.50 रुपयांना मिळेल. मुंबईतील भाव 1.50 रुपयांनी घसरून 1,708.50 रुपये झाले आहेत. तर कोलकातामध्ये किंमत 50 पैशांनी वाढली आहे आणि नवीनतम किंमत 1,869 रुपये झाली आहे.
एका महिन्यात दुसऱ्यांदा कपात
यापूर्वी 22 डिसेंबरलाही तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली होती. तेव्हा 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 30.50 रुपयांनी कमी झाली होती. त्याआधी १ डिसेंबरलाही व्यावसायिक एलपीजी सिलिंडर स्वस्त झाले होते. सरकारी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीचा पंधरवड्याने आढावा घेतात.
Reduction in price of LPG cylinders
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून इम्रान खान यांना मोठा धक्का, उमेदवारी रद्द
- विनेश फोगटने खेलरत्न-अर्जुन पुरस्कार परत केले; बजरंग पुनिया म्हणाला- महिला कुस्तीपटूंसाठी सर्वात वाईट काळ
- महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरेंचा पलड़ा पवारांवर भारी; पवारांच्या “राष्ट्रीय” राजकारणाची ही तर खरी “बारामती श्री”!!
- रशियाच्या बॉम्बहल्ल्यांनी युक्रेन हादरले, 122 क्षेपणास्त्रे, 36 ड्रोनने हल्ला; 24 जणांचा मृत्यू