• Download App
    Recruitment process of women fire fighters in army from 8th November

    Agniveer Recruitment : सैन्य दलात महिला अग्निवीरांची 8 नोव्हेंबर पासून भरती प्रक्रिया

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलात महिला अग्निवीरांची भरती सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत 8 नोव्हेंबर 2022 रोजी हरियाणातील अंबाला येथे महिला अग्निवीरांसाठी पहिला भरती मेळावा होणार आहे. या भरतीअंतर्गत आर्मी कॉर्प्स मिलिटरी पोलीस पदांवर महिला अग्निवीरांची भरती सुरू होईल. याशिवाय हवाई दलातही महिला अग्निवीरांच्या पुढील बॅचसाठी म्हणजेच 2023 च्या भरतीसाठी अर्ज केले जात आहेत. Recruitment process of women fire fighters in army from 8th November

    8 नोव्हेंबर 2022 रोजी सैन्यदल लष्करी पोलिस (CMP) साठी महिलांची भरती प्रक्रिया सुरू होईल. लष्कराच्या एकमेव विभागात मिलिटरी पोलिस पदांवर महिलांना जवान म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे.



    सैन्याच्या बहुतेक कॉर्प्स आणि युनिट्समध्ये अधिकारी पदावर महिलांना नियुक्त केले जाऊ शकते. केवळ लष्कराच्या इन्फंट्री, मेकॅनाइज्ड-इन्फंट्री, आर्मर्ड (टँक रेजिमेंट) आणि कॉर्प्स आर्म्स सारख्या आर्टिलरीमध्ये महिलांना अधिकारी म्हणून नियुक्त करता येत नाही. 2020 मध्ये लष्करी पोलिसांमध्ये शिपाई पदावर महिलांची भरती करण्यात आली होती आणि नुकतेच त्यांनी त्यांच्या सेवेचे एक वर्ष पूर्ण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा दिवाळी साजरी करण्यासाठी कारगिलला गेले होते, तेव्हा त्यांनी सैनिकांसोबतच्या भेटीदरम्यान विशेषतः लष्करी पोलिसांच्या महिला जवानांची भेट घेतली होती.

    Recruitment process of women fire fighters in army from 8th November

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट