• Download App
    नोकरीची संधी : 2023 मध्ये महाराष्ट्रात 8169 शासकीय पदांसाठी भरती; करा अर्ज Recruitment 2023 for 8169 Govt Posts in Maharashtra; Apply

    नोकरीची संधी : 2023 मध्ये महाराष्ट्रात 8169 शासकीय पदांसाठी भरती; करा अर्ज

    प्रतिनिधी

    मुंबई : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना MPSC ने दिलासा दिला आहे. महाराष्ट्रात तब्बल 8169 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून पदे भरली जाणार आहेत. Recruitment 2023 for 8169 Govt Posts in Maharashtra; Apply

    महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त सेवा मुख्य परीक्षा २ सप्टेंबर २०२३ रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. या उमेदवारांचा पे स्केल १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० या दरम्यान असणार आहे.

    किती पदे भरली जाणार?

    सहायक कक्ष अधिकारी : ७० पदे

    महाराष्ट्र लोकसेवा आयोग : ८ पदे

    वित्त विभागाचे राज्य कर निरीक्षक : १५९ पदे

    गृह विभाग पोलीस उपनिरीक्षक : ३७४ पदे

    वित्त विभाग कर सहाय्यक : ४६८ पदे

    लिपिक टंकलेखक : ७ हजार ३४ पदे

    महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.HTTPS://T.CO/MCMN6PEQPT

    — MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION (@MPSC_OFFICE) JANUARY 20, 2023

    Recruitment 2023 for 8169 Govt Posts in Maharashtra; Apply

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!