वृत्तसंस्था
नवी दिल्ली : परदेशात जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास आणखी सुखाचा होणार आहे.कारण भारताच्या लसीकरण प्रमाणपत्राला आणखी पाच देशांनी मान्यता दिली आहे. Recognition of India’s corona vaccination certificate by five countries; Great convenience for passengers
एस्टोनियीया, किर्गिस्तान, फिलिस्तीन,मॉरिशस आणि मंगोलिया या देशांचा प्रमाणपत्राला मान्यता दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारने देखील भारताच्या कोव्हॅक्सिन लसीला मान्यता दिली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये जाणाऱ्या कोणत्याही भारताला नागरिकाला सहज प्रवेश मिळणार आहे. कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना ऑस्ट्रेलियाला प्रवास करता येणार आहे. यापूर्वी जर्मनी, फ्रांस, नेपाळ, बेलारुस, आर्मेनिया, लेबनान,यूक्रेन,बेल्जियम,हंगरी आणि सार्बिया या देशांनी भारतीय लसीकरणाच्या प्रमाणपत्राला मान्यता दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, ज्या देशांनी भारतातील लसीकरणाला मान्यता दिली आहे. त्या देशात भारतीय प्रवाशांना आपले लसीकण सर्टिफिकेट दाखवावे लागेल. त्याचप्रमाणे देशात जाण्याचे कारण देखील सांगावे लागेल.
Recognition of India’s corona vaccination certificate by five countries; Great convenience for passengers
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान