विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सत्ताधारी पक्षाच्या जवळपास २४ असंतुष्ट खासदारांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना धक्का देण्याची तयारी केली आहे. विरोधकांनी संसदेत मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर त्यांच्या विरोधात मतदान करण्याची उघडपणे धमकी दिली आहे.Rebellion within the party threatens Imran Khan, PM’s post in danger
त्यामुळे इम्रान खान यांचे पंतप्रधान पद धोक्यातपाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) च्या सुमारे 100 खासदारांनी 8 मार्च रोजी नॅशनल असेंब्ली सचिवालयात अविश्वास प्रस्ताव सादर केला. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकार देशातील आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
यासाठी राष्ट्रीय असेंब्लीचे अधिवेशन २१ मार्च रोजी बोलावणे अपेक्षित असून २८ मार्च रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. संयुक्त विरोधी पक्षाने अविश्वास प्रस्ताव सादर केल्यानंतर सरकारमधील काही पक्षांमध्ये गोंधळ सुरू झाला. परंतु खान यांना खरा धक्का गुरुवारी बसला जेव्हा त्यांच्याच पक्षातील सुमारे 24 खासदार त्यांचे सरकार पाडण्याच्या प्रयत्नात सामील झाले आहेत.
राजा रियाझ या खासदारांपैकी एक यांनी जिओ न्यूजला सांगितले की खान महागाई नियंत्रित करण्यात अयशस्वी ठरले आहेत . दुसरे खासदार नूर आलम खान यांनी सांगितले की त्यांच्या अनेक तक्रारी सरकारकडून दूर केल्या जात नाहीत. आम्ही दोन डझनहून अधिक सदस्यांचा भाग आहोत जे सरकारच्या धोरणांवर खूश नाहीत. मतदारसंघात गॅस टंचाईचा मुद्दा अनेकदा मांडला पण काहीही झाले नाही,ह्व खान म्हणाले.
असंतुष्ट खासदार इस्लामाबादमधील सिंध हाऊसमध्ये मुक्कामास आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) द्वारे सिंध हाऊस चालविले जाते. प्रांतीय मंत्री आणि सिंध सरकारचे प्रवक्ते सईद घनी म्हणाले की, सरकार अपहरण करेल अशी भीती खासदारांना वाटते. डॉ रमेश कुमार वांकवानी हे देखील सिंध हाऊसमध्ये थांबलेल्य् खासदारांपैकी आहेत.
पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत असंतुष्टांना कसे अपात्र ठरवायचे याबद्दल खान त्यांच्या कायदेशीर टीमचा सल्ला घेत आहेत. परंतु पक्षाच्या नेत्याच्या स्पष्ट निदेर्शांकडे दुर्लक्ष करून एखाद्या खासदाराने स्वत:च्या पक्षाच्या विरोधात मत दिल्यावर कायदा लागू केला जाऊ शकतो. खान यांची सत्तेवरील पकड कमकुवत होत असताना,
त्यांनी 10 लाख कामगार एकत्र करण्याच्या उद्देशाने 27 मार्च रोजी राजधानीच्या मध्यभागी मोठ्या रॅलीची हाक देऊन आपला पाठिंबा गोळा केला आहे.विरोधी पक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना 25 मार्च रोजी संसदेसमोरील डी-चौक ताब्यात घेण्यासाठी इस्लामाबादच्या दिशेने कूच करण्यास सांगितल. त्यानंतर खान यांनी रॅली काढण्याची योजना आखली आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने गेल्या आठवड्यात मीडियाला सांगितले की सैन्य तटस्थ राहील, खान यांनी काही दिवसांनंतर खैबर-पख्तूनख्वा येथे एका रॅलीला संबोधित करताना केवळ प्राणी तटस्थ असतात असे म्हणून इम्रान खान यांनी त्यांना डिवचले होते.
Rebellion within the party threatens Imran Khan, PM’s post in danger
महत्त्वाच्या बातम्या
- चंद्रशेखर माजी उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांची तंबाखू सोडविण्यासाठी झडती घ्यायचे तर नरेंद्र मोदी पुडी लपून ठेवायचे
- अभिनेता विरुध्द फॅशन डिझायनर, शत्रूघ्न सिन्हा यांच्याविरुध्द भाजपाच्या अग्निमित्रा पॉल
- पावसात भिजूनही तुम्हाला ५४ च्या पुढे जाता आले नाही, गोपीचंद पडळकर यांची शरद पवार यांच्यावर टीका
- पी. चिदंबरम यांचा प्रियंका गांधींवर निशाणा, पक्षाची पुनर्बांधणी आणि निवडणुका एकाच वेळी लढवू नका असे सांगूनही ऐकले नाही
- नागालॅँडमध्ये भाजपा रचणार इतिहास, राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी एका महिलेला उमेदवारी दिली आहे.
- अमेठीत होळीच्या मारामारीत आठ जण जखमी दोघे मृत; दोन गंभीर जखमीं