विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या ‘तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पुढच्या महिन्यात दीड लाख ‘आयसीयू बेड’ तयार ठेवले पाहिजे,’’ असे मत निती आयोगाने व्यक्त केले आहे. Ready 1.5 lack beds for third wave
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, बहुतेस सर्व राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन निती आयोगाने आधीच उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत सहा लसींना परवानगी दिली असून, लहान मुलांच्या लसीलाही परवानगी देण्यात आली आहे. ती लस सप्टेंबरपासून उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
दरम्यान तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी काही सूचना केल्या आहेत. ‘‘गंभीर आणि मध्यम लक्षणे असलेल्या सुमारे २० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासेल. एका दिवसात ४ ते ५ लाख जणांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. पुढच्या महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवले पाहिजेत. यात व्हेंटिलेटरसह १.२ लाख आयसीयू बेड, ७ लाख नॉन-आयसीयू हॉस्पिटल बेड असावेत, ’’ अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
Ready 1.5 lack beds for third wave
महत्त्वाच्या बातम्या
- टोकियोमध्ये पदकांची लयलूट; देवेंद्र झांजरिया, योगेश कथुनिया यांना रौप्य पदक; तर सुंदर सिंगला ब्राँझपदक
- Jai Kanhaiya Lal ki : गोकुळाष्टमी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजले ; पहा फोटो
- योगेश काथुनियाला टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये थाळीफेकमध्ये रौप्यपदक ; भारताची आणखी एक चमकदार कामगिरी
- Tokyo Paralympics 2020 : अवनी लेखराने घेतला “सुवर्णवेध”; नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक