अग्निवीर योजनेच्या नावाने खडे फोडण्यापूर्वी समस्त तरुणांनी हा लेख वाचावा…!!
१) MPSC , UPSC च्या मोहजालात अडकून तिशी पार होते. आई बाप पुण्यात ठेवून पाण्यासारखा पैसा खर्च करतात आणि पदरी निराशा येते.
त्या ऐवजी… १० + २ + ३ वर्षाची कोणतीही पदवी घ्या…
अग्नीवीर व्हा. चार वर्षात शरीर, मन कणखर करा…
उत्तम परफॉर्म केले पूर्ण वेळ सैन्यात जाल…
सामान्य परफॉर्म केले तरी हरकत नाही बाहेर पडताना खिशात १२ ते १५ लाख असतील आणि वय असेल २५ .
रसरशीत तारुण्य , दणकट शरीर , कणखर मन… आणि खिशात पैसे….
कोणताही व्यवसाय सुरु करा, शेती मध्ये पैसे घाला आणि राबा … कुणाच्याही पाया पडायची गरज नाही.. आई बापांना मालमत्ता गहाण ठेवायची गरज नाही स्व कमाईवर धंदा सुरु कराल…
२ ) 30 वर्षाचे होईतो छान सेटल झालेले असाल.. तुमचे MPSC वाले मित्र अजूनही तिथेच रेंगाळत असतील…
३) शारीरिक सक्षमता तुम्हाला बाहेर पडल्यावर पोलीस भरती, security अशा किती तरी ठिकाणी नोकरीला पात्र करेल.
४ ) देशासाठी लढताना कामी आलात तर जन्म सफल होईल…
मेडिकल आणि इंजिनियरिंग च्या मायाजालात न फसता आपली सामान्य बुद्धिमत्ता आहे हे लक्षात घेऊन ही एक अत्यंत उत्तम संधी आहे असे माझे स्पष्ट मत आहे…!!
Read this before breaking the rocks in the name of Agniveer Yojana
महत्वाच्या बातम्या
- संभाजीनगरचा पाणीप्रश्न : भाजप ते राज्यपाल चौफेर कोंडीनंतर खुद्द मुख्यमंत्र्यांना घालावे लागले लक्ष!!
- विधान परिषद निवडणूक : काँग्रेससाठी अपक्षांना आले प्राधान्य; अजित पवारांना बनविले मध्यस्थ!!
- अग्निपथ योजना : विरोधकांकडे खरे मुद्दे नसल्याने गैरलागू मुद्द्यांवर वाद पेटवला; जनरल व्ही. के. सिंहांचा हल्लाबोल
- गडकरींची महत्त्वाची घोषणा : चुकीच्या पार्किंगचा फोटो पाठवणाऱ्याला 500 रुपयांचे बक्षीस, यासाठी कायदाही आणणार