वृत्तसंस्था
हैदराबाद : तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात एका रासायनिक कारखान्यात रिॲक्टरचा स्फोट होऊन पाच जणांचा मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत. बुधवारी (3 एप्रिल) सायंकाळी 5 वाजता ही घटना घडली.Reactor blast at Telangana factory, 5 killed; 50 people were present at the time of the accident
अजून अनेक लोक या आगीत अडकले असल्याचे अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले. मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक आणि प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाच्या वेळी इमारतीत 50 लोक उपस्थित होते.
एसबी ऑरगॅनिक्स लिमिटेड असे या कारखान्याचे नाव आहे. जो संगारेड्डी जिल्ह्यातील चांदूर गावात आहे. स्फोटानंतर कारखान्यातून काळा धूर निघू लागला. स्थानिक लोकांनी तात्काळ याची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर लगेच घटनास्थळी अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यापैकी फक्त काहींची परिस्थिती गंभीर आहे.
कारखान्यात झालेल्या स्फोटानंतरची छायाचित्रे
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी कारखान्यात झालेल्या स्फोटावर शोक व्यक्त केला आहे. एसबी ऑरगॅनिक्सच्या रिॲक्टरमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना धक्कादायक असल्याचे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. जखमींना उत्तम उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. पीडित कुटुंबांप्रती माझ्या संवेदना.
Reactor blast at Telangana factory, 5 killed; 50 people were present at the time of the accident
महत्वाच्या बातम्या
- तब्बल 22 उमेदवार जाहीर करून ठाकरेंनी उभा केला भाजप विरोधात लढा; पण पवार फक्त 5 जागांचा का नाही सोडवू शकत तिढा??
- अयोध्येने ‘या’ बाबतीत मक्का आणि व्हॅटिकन सिटीला टाकले मागे!
- हेमा मालिनींच्या उमेदवारी पुढे शस्त्रे टाकत बॉक्सर विजेंदर मथुरेच्या बाजारातून थेट भाजपच्या गोटात!!
- पोलिस भरती परीक्षा प्रकरणातील मुख्य आरोपी राजीव मिश्रा याला नोएडा STFने केली अटक