वृत्तसंस्था
पाटणा : पेगासस हेरगिरीपासून कृषी कायद्यांपर्यंत सर्व मुद्द्यांवर विरोधी पक्ष संसदेच्या कामकाजात अडथळा आणून लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही बंद पाडत आहेत. तरी देखील विरोधकांशी संवाद साधण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांवरून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.Reaching out does not mean hands in pockets, stiff face:RS MP Manoj Jha on govt’s efforts to end Parliament logjam
ते म्हणाले की, जॅकेटच्या खिशात हात घालून आणि ताठर चेहरा ठेवून विरोधकांना समोरे जाणे म्हणजे विरोधकांशी चर्चा करणे नव्हे. मोदी सरकारला विरोधकांशी खरी चर्चाच करायची नाही. त्यांना आपला अजेंडा पुढे रेटून न्यायचा आहे. म्हणून ते विरोधकांशी चर्चा करण्याचे नाटक वठवत आहेत, अशी टीका मनोज झा यांनी केली.
मोदी सरकार मधील मंत्री राजनाथ सिंग, प्रल्हाद जोशी आदी नेते काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या खासदारांच्या संपर्कात आहेत. पेगासस हेरगिरी, कृषी कायदे यांच्यासह सर्व मुद्द्यांवर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चेची सरकारने तयारी दाखविली आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी लोकसभेत शेती संदर्भातील चार तास झालेल्या चर्चेला सविस्तर उत्तर दिले.
यात त्यांनी कृषी कायद्यासंदर्भात सर्व प्रकारची चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे नमूद केले. विरोधी पक्ष आणि शेतकरी आंदोलक सरकारशी चर्चेसाठी पुढे येत नाहीत. ते फक्त संसदेत गोंधळ घालून संसदेबाहेर सरकारवर आरोप करत राहतात, अशी टीका नरेंद्र सिंग तोमर यांनी केली होती.
मनोज झा यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर “जॅकेटच्या खिशात हात आणि ताठर चेहरा”, अशी वैयक्तिक टीका करून संसदेतल्या कामकाजाला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न केला आहे.
Reaching out does not mean hands in pockets, stiff face:RS MP Manoj Jha on govt’s efforts to end Parliament logjam
महत्तवाच्या बातम्या
- टेरर फंडिंग प्रकरणात छापे; एनआयएने जम्मू-काश्मीरच्या 14 जिल्ह्यांमध्ये 45 ठिकाणी छापे घातले, फुटीरतावादी संघटना जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांची घरांची झडती
- MADE IN INDIA : मोदी है तो मुमकिन है ! स्वदेशी टॉय फॅक्ट्री 410 कोटींची गुंतवणूक ; 2024 पर्यंत भारतीय खेळणी उद्योग उलाढाल 200 अब्ज ; यासह हजारो रोजगार…
- FIH Ranking : Tokyo Olympic मधील ऐतिहासिक कामगिरीचं फळ ! भारतीय पुरुष हॉकी संघ तिसऱ्या स्थानावर तर महिला संघाची आठव्या स्थानावर उडी
- बकरी ईदवर निर्बंध न लादलेल्या केरळमध्ये सार्वजनिक ठिकाणी, मंदिरांमध्ये बाली तर्पणवर बंदी