• Download App
    IRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन RCTC's Chardham Yatra Package

    IRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन

    प्रतिनिधी

    मुंबई : IRCTC अंतर्गत विविध टूर्सचे आयोजन केले आहे. देशवासीयांना तीर्थक्षेत्रांना भेट देता यावी यासाठी भारतीय रेल्वे विविध टूर पॅकेज जाहीर करते. IRCTC ने नुकतेच चारधाम यात्रेसाठी आझादी रेल आणि देखो अपना देश अंतर्गत स्वस्त आणि मस्त टूर पॅकेज ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे. ११ रात्री आणि १२ दिवसांचे IRCTC चे हे चार धाम यात्रा पॅकेज असून यामध्ये विविध क्लासनुसार भाडेदर आकारण्यात आले आहेत. RCTC’s Chardham Yatra Package

    या ठिकाणांना भेट देण्याची संधी

    हरिद्वार, बरकोट, जानकीचट्टी, उत्तरकाशी, गंगोत्री, गुप्तकाशी, सोनप्रयाग, केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री या ठिकाणांचे दर्शन दिले जाणार आहे.

    Twitter-IRCTC ला संसदीय समितीने पाठवले समन्स : वापरकर्त्यांच्या डेटा गोपनीयता-सुरक्षेबाबत प्रश्न

    १४ मे २०२३ पासून यात्रेला सुरूवात 

    १४ मे २०२३ रोजी मुंबई येथून चारधाम यात्रेला सुरूवात होणार आहे. प्रवाशांना येथून विमानाने दिल्लीला आणले जाणार आहे. यानंतर दिल्लीहून हरिद्वार, बरकोट, गंगोत्री, गुप्तकाशी, जानकीचट्टी, केदारनाथ, यमुनोत्री, सोनप्रयाग, उत्तरकाशी आणि बद्रीनाथपर्यंत रस्तेमार्गाने नेण्यात येईल. IRCTC च्या या पॅकेजमध्ये निवास व्यवस्थेसोबत नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्थी केली जाणार आहे. यासोबत प्रवासासाठी बस, टॅक्सी, ट्रेन आणि विमान सेवेचा वापर करण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्रांवर IRCTC चा मार्गदर्शक सुद्धा उपलब्ध असणार आहे.

    कुठे कराल बुकिंग

    IRCTC ने ट्विटरवर या यात्रेबाबत तपशील शेअर केले आहेत. तुम्ही 8287931886 किंवा www.irctctourism.com या अधिकृत वेबासाईटला भेट देऊन तुमच्या यात्रेचे बुकिंग करू शकता. पर्यटकांची राहण्याची व्यवस्था स्टँडर्ड हॉटेल्स किंवा गेस्ट हाऊसमध्ये केली जाणार आहे.

    विभागवार भाडेदर (क्लास)

    सिंगल : ६९ हजार १११ रुपये प्रतिव्यक्ती

    ट्विन : ५२ हजार १११ रुपये प्रतिव्यक्ती

    ट्रिपल : ५१ हजार १११ रुपये प्रतिव्यक्ती

    लहान मुले ( बेडसुविधा ५ते११ वर्ष) : ४५ हजार १११ रुपये

    लहान मुले ( बेड सुविधेशिवाय ५ ते ११ वर्ष ) : ३७ हजार ५११ रुपये

    लहान मुले ( २-४ वर्ष) : १३ हजार ५११ रुपये

    RCTC’s Chardham Yatra Package

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mamata Banerjee : सीएम ममता म्हणाल्या- शहा एक दिवस मोदींचे मीर जाफर होतील; ते काळजीवाहू पंतप्रधानांसारखे वागत आहेत

    Rahul Gandhi : राहुल गांधींनी कोलंबियातील कॉफी शॉपचा व्हिडिओ शेअर केला; म्हणाले- तिथे कॉफी एक पीक नाही, तर त्यांची ओळख

    PM मोदी म्हणाले- भारताला एकेकाळी 2G साठी संघर्ष करावा लागला; आज सर्व जिल्ह्यांत 5G कनेक्टिव्हिटी