• Download App
    कट्टर खालिस्तान विरोधी मुख्यमंत्री शहीद सरदार बेअंत सिंग यांचे नातू खासदार रवनीत सिंग बिट्टू भाजपमध्ये दाखल!! Ravneet Singh Bittu joins BJP

    कट्टर खालिस्तान विरोधी मुख्यमंत्री शहीद सरदार बेअंत सिंग यांचे नातू खासदार रवनीत सिंग बिट्टू भाजपमध्ये दाखल!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेसच्या जुन्या ज्येष्ठ जाणत्या नेत्यांचे नातेवाईक भाजपमध्ये दाखल होण्याचा सिलसिला आजही थांबले जाणार नाही पंजाबचे कट्टर खलिस्तान विरोधी मुख्यमंत्री शहीद सरदार बेअंत सिंग यांचे नातू आणि लुधियानाचे खासदार रवनीत सिंग बिट्टू हे आज भाजपमध्ये दाखल झाले. Ravneet Singh Bittu joins BJP

    पंजाबच्या कुठल्याही प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्या भूमिकेशी सुसंगत राजकारण करता यावे म्हणूनच आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलो, असे रवनीत सिंग बिट्टू यांनी स्पष्ट केले.

    रवनीत सिंग बिट्टू हे भाजपमध्ये येणारे पंजाब मधले तिसरे काँग्रेस खासदार असून जुन्या जाणत्या ज्येष्ठ नेत्याचे तिसरे नातेवाईक आहेत. याआधी केरळचे माजी मुख्यमंत्री ए. के. अँटनी यांचा मुलगा आणि अँटनी आणि माजी मुख्यमंत्री के. करुणाकरण यांच्या मुलीने देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी खासदार परणीत कौर यांनी देखील नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

    खलिस्तान विरोधी भूमिका घेऊन पंजाबच्या राजकारणावर काँग्रेसची पकड पुन्हा मिळवून देणारे सरदार बेअंत सिंग हे पक्षाचे दिग्गज नेते होते. खलिस्तान विरोधात भूमिका घेतल्यामुळे खलिस्तान्यांनी त्यांची ते मुख्यमंत्री असताना गोळ्या घालून हत्या केली होती. परंतु, त्यांच्या कुटुंबाने खलिस्तान विरोधी भूमिका सोडली नाही. त्यांचे नातू रवनीत सिंग बिट्टू हे सलग तीन वेळा पंजाब मधून वेगवेगळ्या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये आनंदपुर साहेब मधून, तर 2014 आणि 2019 मध्ये लुधियाना मधून त्यांनी निवडणूक लढवून विजय मिळवला होता. आता ते भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजप देखील त्यांना लोकसभेची उमेदवारी देणार आहे.

    Ravneet Singh Bittu joins BJP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bihar : बिहारच्या बेतिया पोलिस लाईनमध्ये कॉन्स्टेबलने सहकारी सैनिकावर ११ गोळ्या झाडल्या

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून