पत्नी रिवाबा जडेजा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली ही माहिती Ravindra Jadeja
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Ravindra Jadeja भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने नुकतीच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता त्याने नवी इनिंग सुरू केली आहे. आता रवींद्र जडेजाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. जामनगरमधील भाजप आमदार आणि रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली.
रवींद्र जडेजा अनेकवेळा पत्नी रिवाबा जडेजासोबत भाजपचा प्रचार करताना दिसला. ते पत्नीसोबत रोड शोमध्येही सहभागी होत असत. आता त्यांने अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रिवाबा जडेजाने X वर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.
Eknath Shinde : एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना भरपाई देणार, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
या महिन्यात बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत जडेजा खेळताना दिसू शकतो. जडेजा शेवटचा T20 विश्वचषक 2024 मध्ये खेळला होता आणि भारताने विजेतेपद पटकावले होते. यानंतर जडेजाने टी-20 इंटरनॅशनलला अलविदा केला. Ravindra Jadeja
रवींद्र जडेजाच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, त्याने भारतासाठी 74 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने 41 डावात 515 धावा केल्या. याशिवाय जडेजाने 29.85 च्या सरासरीने आणि 7.13 च्या इकॉनॉमीने 54 विकेट्स घेतल्या आहेत.
जडेजाने टीम इंडियासाठी आतापर्यंत 197 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 132 डावात एकूण 2756 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 13 अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, जडेजाच्या नावावर वनडेत एकही शतक नाही. याशिवाय त्याने गोलंदाजी करताना 220 विकेट्स घेतल्या आहेत. 5/33 ही त्याची वनडेतील सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
Ravindra Jadeja enters in BJP
महत्वाच्या बातम्या
- Suhas Yathiraj : पॅरालिम्पिक 2024: भारताला 12वे पदक, सुहास यथीराजने बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकले
- PM Modi : …म्हणून पंतप्रधान मोदींनी पुन्हा घेतले भाजपचे सदस्यत्व!
- 2 महिन्यांवर निवडणूक आली तरी, महाराष्ट्रात काँग्रेस मुख्यमंत्री ठरवेना; पण 5 वर्षांनंतरच्या निवडणुकीत राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाचा 100 % वायदा!!
- Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर मोठी दरड कोसळली, अनेक लोक अडकले