• Download App
    ‘’बिहारमध्ये आंदोलन केल्यावर लोकांची हत्या केली जाते’’ कटिहार घटनेवरून रविशंकर प्रसाद यांची नितीश कुमारांवर टीका! Ravi Shankar Prasads criticism of Nitish Kumar on the Katihar incident

    ‘’बिहारमध्ये आंदोलन केल्यावर लोकांची हत्या केली जाते’’ कटिहार घटनेवरून रविशंकर प्रसाद यांची नितीश कुमारांवर टीका!

    ‘’तुमची कायदा आणि सुव्यवस्था एवढी ढिसाळ का आहे?’’ असा सवालही केला.

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : बिहारच्या कटिहारमध्ये गोळीबाराचा मुद्दा आता चांगलाच तापू लागला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पोलिसांच्या कारवाईवर विरोधक सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. भाजपा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत आहे. Ravi Shankar Prasads criticism of Nitish Kumar on the Katihar incident

    आधी राजधानी पाटण्यात पोलिसांनी भाजपा नेत्यांवर लाठीचार्ज केला आणि आता कटिहारमध्ये वीज पुरवठ्याच्या मागणीवरून ग्रामस्थांवर गोळीबाराची घटना घडली आहे. ताज्या प्रकरणांबाबत, बिहारमध्ये जंगलराज परत आल्याचे म्हटले जात आहे.

    भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांनीही कटिहार घटनेबाबत मुख्यमंत्री नितीश यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘’बिहारमध्ये आंदोलन केल्याने लोकांना मारले जाते. मुख्यमंत्री नितीश यांना प्रश्न विचारत रविशंकर प्रसाद म्हणाले की, ‘तुमची कायदा आणि सुव्यवस्था एवढी ढिसाळ का आहे? तुम्ही भाजपा आमदारांवर लाठीचार्ज करता आणि महिलांचाही आदर करत नाही.’’  तसेच, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, असे ते म्हणाले.

    Ravi Shankar Prasads criticism of Nitish Kumar on the Katihar incident

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Anmol Ambani : अनिल अंबानींनंतर मुलगा अनमोलवर FIR; युनियन बँकेकडून ₹228 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

    India Aging : 2036 पर्यंत प्रत्येक 7 पैकी 1 भारतीय ज्येष्ठ नागरिक असेल; केंद्रीय मंत्री म्हणाले- लोकसंख्या वेगाने वृद्ध होत आहे

    IMF Loan : IMF ने पाकिस्तानला ₹11,000 कोटींचे कर्ज दिले; जगभरातील वाईट परिस्थितीतही अर्थव्यवस्था स्थिर ठेवल्याचा दावा