वृत्तसंस्था
झाशी : “मेरी झांसी नही दुंगी”, असे म्हणत ब्रिटिशांची लढताना हौतात्म्य पत्करणार्या राणी लक्ष्मीबाई यांच्या झाशीतून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्ररक्षा समर्पण पर्वाला सुरुवात केली. बुंदेलखंड डिफेन्स कॉरिडॉरमध्ये भारत डायनामिक्स लिमिटेडच्या नवा फ्लँटचा शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला.Rashtra Raksha Samarpan Parv is Jhansi is beginning of a new chapter in history of the defence in India.
त्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, संरक्षण दलाचे तीन प्रमुख उपस्थित होते. झाशीच्या ऐतिहासिक किल्ल्यात जाऊन पंतप्रधान मोदी यांनी राणी लक्ष्मीबाई आणि अन्य स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली.
देशाच्या संरक्षण गरजांपैकी 90 टक्के संरक्षण सामग्री उत्पादने येत्या काही वर्षातच भारतात सुरू होतील, अशी खात्री संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.
या डिफेन्स कॉरिडॉरमुळे बुंदेलखंडला जगभरात नवी ओळख मिळेल. इथल्या उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढेल, असा आत्मविश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
देव दीपावली, कार्तिक पौर्णिमा गुरु नानक देव जयंती, राणी लक्ष्मीबाई यांची जयंती, प्रकाश पर्व निमित्ताने संरक्षण क्षेत्रात भारताचे एक महत्त्वाचे पाऊल दमदार पाऊल आज पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेनेच्या विद्यार्थ्यांना देखील संबोधित केले.
Rashtra Raksha Samarpan Parv is Jhansi is beginning of a new chapter in history of the defence in India.
महत्त्वाच्या बातम्या
- शिल्पा शेट्टीने मुंबईत सुरु केले रेस्टॉरंट ; सेलिब्रेटींनीसुद्धा जेवणासाठी हजेरी लावली
- कृषी कायदे रद्द; हे फक्त शेतकरी आंदोलकांचे यश, विरोधी पक्षांचे नव्हे; अण्णा हजारे यांचा टोला
- कृषी कायदे मागे घेताच कॅप्टन अमरिंदर यांचा उघडपणे मोदींना पाठिंबा, म्हणाले- भाजपसोबत जागा वाटून पंजाबमध्ये निवडणूक लढवणार
- Farm Laws : कृषी कायदे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला काय करावे लागणार? वाचा सविस्तर पूर्ण प्रक्रिया…