प्रतिनिधी
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात महाविकास आघाडीच्या सरकारने वादग्रस्त ठरविलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना बढती मिळाली आहे. शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी बढती एसीसीकडून मंजूर करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला, अतुलचंद्र कुलकर्णी, सदानंद दाते यांच्यासह २० आयपीएस अधिकाऱ्यांना बढती मिळाल्याची माहिती मिळाली आहे. Rashmi Shuklana approved for the post of Director General of Police
रश्मी शुक्लांवर आरोप
शनिवारी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. रश्मी शुक्लांवर आरोप १९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तत्कालीन सरकारने याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून चौकशीसाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान, त्यांची चौकशी सुरू असताना त्यांची केंद्रात प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद येथे केंद्रीय राखीव दलाच्या प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती.
एसीसीकडून बढती मंजूर
दरम्यान आता रश्मी शुक्ला यांना एसीसीकडून पोलीस महासंचालकपदी एसीसीकडून बढती मंजूर करण्यात आली आहे.
Rashmi Shuklana approved for the post of Director General of Police
महत्वाच्या बातम्या
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पर्यटक सर्किट ट्रेनचे 14 एप्रिलला उद्घाटन
- रमेश बैस महाराष्ट्राचे राज्यपाल; छत्तीसगडचे दिग्गज नेते, रायपूरचे सलग सहावेळा खासदार ते केंद्रीय मंत्री!!
- अल निनोमुळे भारताच्या मान्सूनवर संकट : या वर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, अमेरिकेच्या हवामान खात्याने दिला इशारा
- पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणी SIT गठीत होणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
- तुर्कस्तान-सीरियातील भूकंपातील मृतांची संख्या 29 हजारांच्या पुढे, संयुक्त राष्ट्राने वर्तवला 50,000 मृत्यूंचा अंदाज