विशेष प्रतिनिधी
लखनौ – रामायणातील राक्षसांचा संदर्भ देताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रशीद अल्वी यांनी जय श्रीरामच्या नावाने घोषणा देणारी सगळीच मंडळी ही काही साधूसंत नसल्याचे सांगत लोकांनी सावध राहणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. अल्वी यांच्या या विधानावर भाजप नेते अमित मालवीय यांनी कडाडून टीका केली आहे.Rashid Alwis controversial remarks
येथे आयोजित कल्की संमेलनामध्ये अल्वी म्हणाले की,” काही मंडळी ही जय श्रीरामच्या नावाने घोषणाबाजी करत लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत पण हे सगळेच घोषणा देणारे लोक काही साधूसंत अथवा मुनी नाहीत. रामराज्यामध्ये द्वेषाला स्थान स्थान नसते.
अल्वी यांच्या या विधानावर भाजपने कडाडून टीका केली आहे. भाजपचे नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” अल्वी यांनी रामाच्या नावाने घोषणा देणाऱ्यांनाच राक्षस ठरविले असून रामांच्या भक्तांबाबत कॉंग्रेसच्या विचारांमध्ये किती विष भरलेले आहे हेच यातून स्पष्ट होते.”
Rashid Alwis controversial remarks
महत्त्वाच्या बातम्या
- पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात कोणता उमेदवार भाजप उभा करणार?
- आंदोलनात सहभागी झालेल्या सांगली मधील वाहक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमूळे खळबळ
- पक्षी निरीक्षण : रंकाळा तलाव पक्षी प्रेमींना खुणावतेय, विविध 43 प्रजातींची नोंद
- आता अमृता फडणवीस यांनीही नवाब मलिकांना पाठवली मानहानीची नोटीस, म्हणाल्या- ४८ तासांत माफी मागा!
- सावरकर प्रेमींच्या संतापानंतर नाशिकच्या साहित्य संमेलन गीतात झाला बदल!!