विशेष प्रतिनिधी
मेरठ : निकाह हलालाच्या बहाण्याने मेरठ मधील एका स्त्रीवर दोन पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
Rape of a woman under the pretext of Nikah Halal
ट्रिपल तलाकला कायदेशीर मान्यता नसतानाही मेरठमधील एका व्यक्तीने आपल्या पत्नीला ट्रिपल तलाक द्वारे सहा महिन्यांपूर्वी तलाक दिला होता. पण काही दिवसांनंतर त्याला आपल्या निर्णयावर पश्चात्ताप झाला. त्याने आपल्या पहिल्या पत्नीसोबत पुन्हा लग्न करण्याची इच्छा दर्शविली. तलाकनंतर आपल्या पहिल्या पत्नीसोबत लग्न करण्याच्या आधी निकाह हलाला नावाची एक प्रथा पार पाडावी लागते.
निकाह हलाला ही एक प्रथा आहे ज्यामध्ये तिहेरी तलाक देणाऱ्या पुरुषाशी पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या स्त्रीला आधी दुसऱ्या पुरुषाशी लग्न करावे लागते. या विवाहानंतर दुसऱ्या पती सोबत घटस्फोट घ्यावा लागतो. आणि ‘इद्दत’ नावाचा विभक्ततेचा कालावधी पाळावा लागतो. यानंतरच ती तिच्या आधीच्या पतीशी लग्न करू शकते.
याचसाठी मौलवीने पीडिताला रियासत नावाच्या व्यक्तीसोबत लग्न करण्यास सांगितले. आणि हे लग्न करण्याच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. ती हॉटेलमध्ये गेल्यानंतर रियासत नामक व्यक्तीने आपल्या मित्राला बोलावून पीडितेवर बलात्कार केल्याची घटना मेरठमध्ये घडली आहे. पीडितेने तिच्या भावाला घडलेल्या घटनेची माहिती दिली आणि त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून मौलवीचा शोध सुरू आहे.
Rape of a woman under the pretext of Nikah Halal
महत्त्वाच्या बातम्या
- पाटणा मॉडेल मर्डर केस : बिल्डरच्या बायकोने सुपारी देऊन संपवलं, धक्कादायक कारण आल समोर
- महाविकास आघाडीवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात , म्हणाले – ‘बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील’, पैसा फेक तमाशा देख’वाल्या लोकांचं हे सरकार
- क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास समीर वानखेडे करणार की नाही?, आरोपांनंतर एनसीबीकडून विभागीय चौकशी, अचानक दिल्लीला बोलावले
- India T20 WC Final : टीम इंडियाला आता चारही सामने जिंकावे लागतील, उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध होऊ शकतो सामना