• Download App
    अल्पवयीन मुलीवर 28 जणांचा बलात्कार, समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर गुन्हा|Rape of a minor girl by 28 persons, crime against the district president of Samajwadi and Bahujan Samaj Party

    अल्पवयीन मुलीवर 28 जणांचा बलात्कार, समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर गुन्हा

    विशेष प्रतिनिधी

    ललीतपुर : जन्मदात्या पित्यानेच मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष यांनीही या मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी नराधम पित्यासह तब्बल २८ जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील ललीतपूर जिल्ह्यात घडली आहे.Rape of a minor girl by 28 persons, crime against the district president of Samajwadi and Bahujan Samaj Party

    पीडित मुलगी अकरावीत शिकते.पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, ती सहावीत शिकत असताना तिच्या वडिलांनी तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला होता. तेव्हापासून वडिलांनी तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. आरोपी पिता लोकांना व्यावसायिक हेतूंसाठी घरी बोलवायचा. तिला अनेक लोकांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा.



    तिने आपल्या तक्रारीमध्ये समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष टिळक यादव, त्यांचे तीन लहान भाऊ, बसपाचे जिल्हाध्यक्ष दीपक अहिरवार, बसपाचे उपाध्यक्ष नीरज तिवारी आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांवर बलात्काराचा आरोप केला आहे.

    या घटेबद्दल कुठेही वाच्यता केल्यास तिच्या पित्याने आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पीडितेने सांगितले. मंगळवारी र २८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुलगी अल्पवयीन आहे आणि तिला एक भाऊही आहे. पीडितेने दिलेल्या माहितीची पडताळणी केली जात आहे.

    तसेच तिचा जबाब नोंदवण्यात येत असून तिची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने सर्व बाबींची योग्य चौकशी केली जाईल,” असे ललितपूरचे एएसपी गिरीजेश कुमार यांनी सांगितले.

    Rape of a minor girl by 28 persons, crime against the district president of Samajwadi and Bahujan Samaj Party

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य